डीपीसीचा २०० कोटींचा निधी उपलब्ध; खर्चाचे हवे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:51 AM2021-01-08T05:51:39+5:302021-01-08T05:51:39+5:30

बुलडाणा : जिल्हा वार्षिक योजनेवरील बंधने शिथिल झाल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यासाठी २६७.२५ लाख रुपयांच्या निधीपैकी २०० कोटी ४४ लाख ...

DPC provides Rs 200 crore; Expenditure planning | डीपीसीचा २०० कोटींचा निधी उपलब्ध; खर्चाचे हवे नियोजन

डीपीसीचा २०० कोटींचा निधी उपलब्ध; खर्चाचे हवे नियोजन

googlenewsNext

बुलडाणा : जिल्हा वार्षिक योजनेवरील बंधने शिथिल झाल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यासाठी २६७.२५ लाख रुपयांच्या निधीपैकी २०० कोटी ४४ लाख रुपयांचा अर्थात ७५ टक्के निधी उपलब्ध झाला आहे.

दरम्यान, आता या निधीतून विकासकामे करण्यास अल्पकालावधी शिल्लक आहे. त्यानुषंगाने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एक बैठक घेऊन प्राप्त प्रस्तावांच्या आधारे या निधीच्या विनियोगाचे नियोजन करणे क्रमप्राप्त असल्याचे माजी मंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार डाॅ. संजय कुटे यांनी म्हटले आहे. उपलब्ध निधी आता अल्पकालावधीत महत्तम स्तरावर खर्च करावा लागणार आहे. विविध विभागाकडून यासंदर्भात आयपास प्रणालीवरच प्रस्ताव मागविण्यात आले आहे. मात्र आवश्यक तेथे हा निधी खर्च करण्याचे नियोजन गरजेचे आहे. निधी व्यपगत न होता तो अधिकाधिक कसा खर्च होईल याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनाही या निधीसंदर्भात सविस्तर माहिती दिली जावी. जी अद्याप दिल्या गेलेली नाही. त्यानुषंगाने नियोजन करणे सोपे होईल. वर्षभरात प्राप्त निधी मार्चअखेरही खर्च होत नाही. त्यामुळे आता अल्पकालावधीत हा निधी खर्च करण्याचे नियोजन यंत्रणेसह पालकमंत्र्यांना करावे लागणार आहे. मिशन मोडवर या कामाला प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे.

नियोजन करण्याची गरज

उपलब्ध निधी व्यपगत होणार नाही, याची काळजी घेऊन पालकमंत्र्यांनी योग्य त्या विभागात हा निधी खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी एक बैठक घेऊन अनुषंगिक नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे विरोधी पक्षाच्या आमदारांनी सांगितले.

कोट

निधी उपलब्ध झालेला आहे. यापैकी ४४ कोटी रुपये कोविड संदर्भाने खर्च करण्यात आले असून, २० कोटी रुपये त्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. निधी खर्चासंदर्भात योग्य नियोजन होईल.

संजय गायकवाड, सत्ताधारी आमदार

कोट

नियोजन होणे क्रमप्राप्त आहे. उपलब्ध निधीपैकी अल्पकालावधीत ३० टक्केच निधी खर्च होण्याची शक्यता आहे. पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती द्यावी. आवश्यकतेनुसार खर्च व्हावा.

- डॉ. संजय कुटे, माजी मंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षाचे आमदार

Web Title: DPC provides Rs 200 crore; Expenditure planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.