डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये पहिल्या महिला डॉ.सय्यद सुबिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:32 AM2021-03-08T04:32:10+5:302021-03-08T04:32:10+5:30

मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बुलडाणा शहरात पहिला कोरोनाचा रुग्ण निघाला व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. ...

Dr. Syed Subia, the first lady at Dedicated Covid Hospital | डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये पहिल्या महिला डॉ.सय्यद सुबिया

डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये पहिल्या महिला डॉ.सय्यद सुबिया

googlenewsNext

मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बुलडाणा शहरात पहिला कोरोनाचा रुग्ण निघाला व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यीनंतर नागपूर लॅबमधून प्राप्त रिपोर्टनुसार हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होता.विदर्भात कोरोनाने मृत्यू झाल्याची ही पहिली घटना घडल्याने प्रशासनासह जिल्हा हादरुन गेला होता. त्यानंतर कोरोना रुग्ण निघणे सुरू झाले व बुलडाणा येथील महिला रुग्णालयाच्या नवीन इमारतीत पहिला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आला. अनेक पुरुष डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देत होते. अशात ६ ऑगस्ट २०२० रोजी या रुग्णालयात पहिल्या महिला आयुष डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली. त्या डॉक्टर होत्या डॉ. सुबिया सय्यद अरशद. तेव्हापासून तर आजपर्यंत डॉ. सुबिया कोरोना रुग्णांची अविरत सेवा करीत आहे. विशेष बाब म्हणजे त्यांचे पती डॉ.सय्यद अरशद हे तर पहिल्या दिवसापासूनच डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये कार्यरत असून रुग्णांची सेवा करत आहे.या दाम्पत्यने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सेवेसाठी स्वतःला झोकून दिलेले आहे. दोन्ही हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवा करत असतांना त्यांची अडीच वर्षाची मुलगीचा संभाळ घरी आजी करते.सुरूवातीला कडक लॉकडाऊन असतांना डॉ.अरशद कोविड रुग्णालयात काम करत असताना अनेक दिवस ते घरी यायचे नाही. तेंव्हा डॉ. सुबिया आपले पतीला रुगनसेवा करण्यासाठी प्रोत्साहित करायचे व त्यांनी सुद्धा कोरोना रुगनांची सेवा करण्याची इच्छा आपले पती डॉ. अरशद यांच्याकडे व्यक्त केली असता डॉ. अरशदने याला होकार दिला.आज दोन्ही दाम्पत्य बुलडाणा येथील कोविड रुग्णालयात रुग्ण सेवा देत आहे.

Web Title: Dr. Syed Subia, the first lady at Dedicated Covid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.