कंट्रोलसाठी हँडब्रेक ओढल्याने कार उडाली हवेत; दोन जखमी
By अनिल गवई | Updated: May 8, 2024 17:26 IST2024-05-08T17:24:38+5:302024-05-08T17:26:22+5:30
खामगाव - शेगाव रोडवरील नवोदय विद्यालयाजवळ बुधवारी दुपारी ही घटना घडली. यात महिलेसह दोघे जण जखमी झाले.

कंट्रोलसाठी हँडब्रेक ओढल्याने कार उडाली हवेत; दोन जखमी
खामगाव : भरधाव असलेली कार नियंत्रित करण्यासाठी अचानक हॅण्डब्रेक ओढल्याने अनियंत्रित कार चक्क हवेत उडाली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन आदळली. खामगाव - शेगाव रोडवरील नवोदय विद्यालयाजवळ बुधवारी दुपारी ही घटना घडली. यात महिलेसह दोघे जण जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार, एमएच २८ - एझेड ६११४ क्रमांकाची कार खामगाव येथून शेगावकडे जात होती. दरम्यान, नवोदय विद्यालयाजवळ चालकाने अचानक हॅण्डब्रेक ओढला. त्यामुळे आधीच अनियंत्रित असलेली कार जागेवर थांबण्याऐवजी हवेत उडून रस्त्यालगतच्या शेतात जाऊन आदळली. यात चालकासह एक महिला गंभीर जखमी झाली. प्रत्यक्षदर्शींनी कारमधील दोघांना तत्काळ शेगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याचे समजते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत असून, अपघात घडला त्यावेळी अनेकांच्या जिवाचा थरकाप उडाला होता.