जलयुक्त शिवाराची कामे होवूनही दरेगावात टंचाई

By admin | Published: May 25, 2017 07:51 PM2017-05-25T19:51:53+5:302017-05-25T19:51:53+5:30

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथे मागील वर्षी जलयुक्त शिवाराची कामे होवूनही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून १ मे पासून या गावात टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे.

Draigao scarcity, despite being a water tank | जलयुक्त शिवाराची कामे होवूनही दरेगावात टंचाई

जलयुक्त शिवाराची कामे होवूनही दरेगावात टंचाई

Next

अशोक इंगळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथे मागील वर्षी जलयुक्त शिवाराची कामे होवूनही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून १ मे पासून या गावात टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. सतत दुसऱ्या वर्षी टँकरने पाणीपुरवठा करणारे हे एकमेव गाव आहे.
मागीलवर्षी अतिअल्प पाऊस झाल्याने नदी, नाले, विहिरी कोरड्या पडल्या होत्या. अनेक गावात विहिरी अधिग्रहण केल्यानंतर काही गावात टँकर सुरु करण्यात आले. त्यात दरेगाव या गावाचा समावेश होता. या गावाची लोकसंख्या ३ हजार असून, पाणी पुरवठ्यासाठी दोनवेळा खर्च करुनही पाणीटंचाई कायम आहे. नदीचे खोलीकरण, नाला खोलीकरण, जलयुक्त शिवार अंतर्गत बंधाऱ्याची कामे सुद्धा झाली. परंतु बंधाऱ्यात पाणी थांबले नाही. विहिरीतही पाणीसाठा नाही. एप्रिल महिन्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने ग्रामपंचायतने ठराव घेवून टँकरची मागणी केली. पंचायत समितीने टँकरची मागणी मान्य करुन टँकर मंजूर केले. मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही दरेगावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने पुढील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागणार यात शंका नाही. त्यासाठी या गावात कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

५ गावात टँकर; २० गावात विहिर
४सिंदखेडराजा तालुक्यात गोरेगाव, दरेगाव, सोनोशी, सावरगाव माळ, सुलजगाव या पाच गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून, दिवसाकाठी दोन ते तिन फेऱ्या टँकर पूर्ण करतात. दरेगाव येथील तीन हजार लोकवस्तीसाठी ४० हजार लिटर पाणी पुरविल्या जाते. गोरेगावातही तीन विहिरीत, सोनोशीत तिन विहिरीत, सावरगाव माळ, सुलजगाव, दरेगावात दोन विहिरीत पाणी टाकल्या जाते. २० गावात पाणी पुरवठ्यासाठी २० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. जलयुक्त शिवार योजनेचा फायदा काही गावांना झाला आहे. त्यात साखरखेर्डा यशस्वी ठरले आहे. उमनगाव आणि जयपूर या दोन गावात टँकरची मागणी असून, प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Draigao scarcity, despite being a water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.