५६ टक्के बेघरांच्या घरांचे स्वप्न साकारले!
By admin | Published: August 28, 2016 11:34 PM2016-08-28T23:34:55+5:302016-08-28T23:34:55+5:30
बुलडाणा जिल्ह्यात इंदिरा आवास योजनेअंतर्गत चार वर्षात होते १४ हजार ४९२ घरांचे उद्दिष्ट.
ब्रह्मनंद जाधव
बुलडाणा, दि. २८: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत इंदिरा आवास योजनेमध्ये जिल्ह्यात गेल्या चार वर्षात १४ हजार ४९२ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी इंदिरा आवास योजनेमुळे जिल्ह्यात ८ हजार १९0 घरकुले पूर्ण झाल्यामुळे गेल्या चार वर्षात केवळ ५६.५१ टक्केच बेघरांच्या घरांचे स्वप्न साकारल्याचे दिसून येत आहे.
इंदिरा आवास ही केंद्र पुरस्कृत योजना सन १९९५-९६ पासून स्वतंत्रपणे राबविली जाते. ग्रामीण भागा तील दारिद्रय़रेषेखालील बेघर, कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा इंदिरा आवास योजनेचा उद्देश आहे. या योजनेतून घरकुल बांधकामासाठी लाभार्थींंची निवड ग्राम पंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतीक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाते. इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय़रेषेखालील असावा, कायम प्रतीक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी देण्यात आलेल्या आहेत. सन २00२ मध्ये झालेल्या दारिद्रय़रेषेच्या सर्व्हेनुसार सन २00७-0८ ते सन २0१४-१५ मध्ये लाभार्थींंची निवड करून घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे.
त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यासाठी सन २0१२-१३ ते सन २0१५-१६ या चार वर्षांंसाठी ८ हजार १९0 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १४ हजार ९३0 घरकुल मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या वर्षात ८ हजार १९0 घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले. जिल्ह्यासाठी इंदिरा आवास योजनेअंतर्गत दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ ५६.५१ टक्केच बेघरांच्या घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर २0१६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात ५ हजार ४९६ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आता प्रधानमंत्री आवास योजना
२0१६-१७ पासून इंदिरा आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणून ओळखली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना २0१६-१७ मध्ये राबविली जाणार आहे. त्यामध्ये घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात १.२0 लाख रुपये प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेचे अर्थसहाय्य राज्यस्तरावरील बँक खा त्यातून लाभार्थींंच्या बँक किंवा पोस्ट खात्यात जमा होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अं तर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, २0११ मधील माहिती लाभार्थींंच्या निवडीकरिता वापरण्या त येणार आहे. या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यासाठी सन २0१६-१७ या वर्षामध्ये ५ हजार ४९६ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
६ हजार ७४0 कुटुंबांना घरांची प्रतीक्षा
बुलडाणा जिल्ह्यात सन २0१२-१३ पासून सन २0१५-१६ पर्यंंत १४ हजार ९३0 घरकुले मंजूर करण्यात आली होती; परंतु त्यापैकी केवळ ८ हजार १९0 घरकुले पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंजूर असलेल्या ६ हजार ७४0 बेघरांना घरकुलांची प्रतीक्षा आहे.