स्वप्नातले घर साकारले प्रत्यक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:38 AM2021-09-06T04:38:19+5:302021-09-06T04:38:19+5:30
बुलडाणा : शहराच्या ठिकाणी स्वत:च्या मालकीचे मोठे घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे काम ...
बुलडाणा : शहराच्या ठिकाणी स्वत:च्या मालकीचे मोठे घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे काम म्हाडाकडून करण्यात येत आहे. अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत बुलडाण्यात २६८ घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. स्वतःचे घर घेण्याची ही चांगली संधी शासनाच्या गृहनिर्माण योजनेने निर्माण केली आहे.
नवीन घर घेणे किंवा मोकळी जागा घेऊन घर बांधणे आता महागले आहे. कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रावर तर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या घराचे स्वप्न अपुरेच राहिले आहे, परंतु गृहनिर्माण योजनेमुळे शहराच्या ठिकाणी स्वत:च्या मालकीचे घर घेण्याची संधी सर्वसामान्य नागरिकांसमोर उपलब्ध झाली आहे. बुलडाण्यातही २०१७ पासून म्हाडाची घरे बांधकाम हाती घेण्यात आली होती. आता या घरांचे जवळपास पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेचा आधार
म्हाडामध्ये घर घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचाही लाभ देण्यात येतो. म्हाडाचे लाभार्थी असलेल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट गाळ्यांकरिता केंद्र व राज्य शासनाकडून २.५० लाख रुपये अनुदानही देण्यात येते. त्यामुळे लाभार्थ्यांना आवास योजनेचाही आर्थिक आधार मिळतो.
किरकोळ दुरुस्तीचे कामे सुरूच
सद्यस्थितीत चार माळ्यांच्या तळमजला व अधिक तीन माळे असे १३ इमारतींचे काम पूर्ण झालेले आहे. या १३ इमारतींमध्ये एकूण २६८ गाळे आहेत. एका गाळ्यामध्ये हॉल, किचन, बेडरूम आणि बाथरूम आहे. वीजपुरवठा व रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. सध्या किरकोळ दुरुस्तीचे कामे सुरू आहेत.
१६४ अर्ज
अमरावी गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत घर घेण्यासाठी एकूण १६४ अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गट गाळ्यांचे १५७ अर्ज, मध्यम उत्पन्न गट गाळ्यांचे पाच अर्ज व उच्च उत्पन्न गट गाळ्यांचे दोन अर्ज प्राप्त झालेले आहेत.
४६.३४ चौमी
प्रत्येक गाळ्याचे बांधकाम क्षेत्रफळ
२९.३४ चौमी
प्रत्येक गाळ्याचे चटाई क्षेत्रफळ
२०.८६
कोटी आतापर्यंत झालेला एकूण खर्च
एकूण घरे २६८
वाटप झालेली घरे १३१