अनियंत्रित टिप्पर नाल्यात उलटल्याने चालकाचा मृत्यू, खामगाव-जलंब रोडवरील घटना

By अनिल गवई | Published: September 26, 2022 05:28 PM2022-09-26T17:28:49+5:302022-09-26T17:29:56+5:30

खामगाव-चांगेफळ रस्ता विस्तारीकरणाच्या कामाला गत काही दिवसांपासून सुरूवात करण्यात आली आहे. रस्ता आणि पूल निर्मितीच्या कामासाठी मुरूम वाहून नेणाऱ्या टिप्पर चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटल्याने भरधाव टिप्पर नाल्यात उलटला.

Driver dies after uncontrolled tipper falls into drain, incident on Khamgaon-Jalamb road | अनियंत्रित टिप्पर नाल्यात उलटल्याने चालकाचा मृत्यू, खामगाव-जलंब रोडवरील घटना

फोटो: माक्ता कोक्ता शिवारात निर्माणाधिन पुलाजवळील नाल्यात उलटलेले टिप्पर.

Next

खामगाव : रस्ता कामासाठी मुरूमाची वाहतूक करणारे एक टिप्पर अनियंत्रित होऊन उलटले. या अपघातात २५ वर्षीय चालक जागीच ठार झाला. खामगाव-जलंब रोडवरील माक्ता-कोक्ता शिवारातील निर्माणाधिन पुलाजवळ ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

खामगाव-चांगेफळ रस्ता विस्तारीकरणाच्या कामाला गत काही दिवसांपासून सुरूवात करण्यात आली आहे. रस्ता आणि पूल निर्मितीच्या कामासाठी मुरूम वाहून नेणाऱ्या टिप्पर चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटल्याने भरधाव टिप्पर नाल्यात उलटला. याखाली दबून मध्यप्रदेशातील विरेंद्र डांगे (२५ रा. मध्यप्रदेश) हा जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त टिप्परमधून चालकाला मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर विरेंद्रचा मृतदेह खामगाव येथील सर्वोपचार रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

घटनेनंतर कामकेले बंद
-  या घटनेची माहिती रस्ताविस्तारीकरणाचे काम करणाºया मजुरांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त स्थळी मदत कार्य करीत, रस्ता विस्तारीकरणाचे काम दुपारनंतर बंद केले.

 

Web Title: Driver dies after uncontrolled tipper falls into drain, incident on Khamgaon-Jalamb road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.