ट्रकखाली मिनीडोअर दबून मुलीसह चालक ठार, राष्ट्रीय महामार्गावर सलग 12व्या दिवशी अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 08:08 PM2018-04-30T20:08:51+5:302018-04-30T20:08:51+5:30

भरधाव ट्रकमधील वजनदार प्लेट पडून त्याखाली मिनीडोअर दबल्याने घडलेल्या अपघातात मिनीडोअर चालकासह १४ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला.

Driver dies under truck, killing driver along with girls, accident on 12th day on national highway | ट्रकखाली मिनीडोअर दबून मुलीसह चालक ठार, राष्ट्रीय महामार्गावर सलग 12व्या दिवशी अपघात

ट्रकखाली मिनीडोअर दबून मुलीसह चालक ठार, राष्ट्रीय महामार्गावर सलग 12व्या दिवशी अपघात

Next

मलकापूर : भरधाव ट्रकमधील वजनदार प्लेट पडून त्याखाली मिनीडोअर दबल्याने घडलेल्या अपघातात मिनीडोअर चालकासह १४ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग ६ तांदुलवाडी पुलाजवळील अलीकडच्या वळणावर आज सोमवारी ४.४५ वाजेच्या सुमाराला घडली. त्यात चार जण गंभीररित्या जखमी असून तीन चिमुकल्यांना जखमा झाल्या आहेत.

यासंदर्भात मिनीडोअर प्रवासी घेऊन चिखली रणथमकडे निघाली होती. विरुद्ध दिशेने भरधाव ट्रक (क्र.जिजे २७-बीटी ८३११) समोरून भरधाव स्पीड बघून मिनीडोअर अलीकडच्या वळणावर त्या ट्रकची भरधाव स्पीड बघून मिनीडोअर चालकाने त्याची गाडी जागीच थांबविली. तेवढ्यात ट्रकमधील मागच्या बाजूने असलेल्या वजनदार प्लेट मिनीडोअरवर पडल्याने सदरची गाडी अक्षरश: दबली. चालक विनोद श्रीधर जगताप (वय ५०) रा. राधाकृष्ण सोसायटी जागीच ठार झाले तर त्यांच्या शेजारी बसलेली पिंकी वासुदेव वानखेडे (वय १४, रा.घोडसगाव चिखली) ही मुलगी डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाली. मनकर्णाबाई लक्ष्मण झनके (वय ४८, रा. रणथम), शोभा संजय खेडकर (वय ३८, रा.गारडगाव ता. खामगाव), दिलीप तुकाराम वानखेडे (वय ४०, रा.चिखली), गजानन दिनकर कांडेलकर (वय २७, रा. दुधलगाव) असे चार जण गंभीररीत्या जखमी झाले.

दरम्यान एमआयडीसी पोलीस व महामार्ग पोलिसांनी जखमींना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ हलविले. अपघातानंतर पोबारा केलेल्या ट्रकचा सरपंच बाळू पाटील, पोहेकाँ संजय निंबोळकर, पोकाँ आनंद माने यांनी पाठलाग केला व मुंधडा पेट्रोल पंपानजीक त्याला पकडले आहे. 

Web Title: Driver dies under truck, killing driver along with girls, accident on 12th day on national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.