accident : दोन ट्रकची समोरासमोर धडक, एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 13:44 IST2022-01-06T11:04:25+5:302022-01-06T13:44:16+5:30
साकोलीजवळील मोहटा जंगल शिवारात आज सकाळी दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन ट्रकचालक जागीच ठार झाला.

accident : दोन ट्रकची समोरासमोर धडक, एक ठार
भंडारा : साकोलीजवळील मोहटा जंगल शिवारात दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एक ट्रक चालक जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली असून साकोली मार्गावरील वाहतूक ३ तासांपासून ठप्प पडली आहे.
सय्यद आमीन (वय २४, नागपूर) असे अपघातातमृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास मोहटा जंगल शिवारात रायपूरकडून नागपूरकडे जाणारा ट्रक (एम एच २४७८५१) व नागपूरकडून रायपूरकडे जाणारा ट्रक (एम एच ४२ बीजी ९११७) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही ट्रकच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात एक ट्रक चालक जागीच ठार झाला. दरम्यान, अपघातग्रस्त दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाल्यामुळे साकोली येथील वाहतूक तीन तासापासून ठप्प झाली आहे.