धावत्या ट्रकमध्ये चालकाला हृदयविकाराचा धक्का; केबिनमध्ये तोंडावर उलटे पडल्याने झाला घात

By अनिल गवई | Published: June 1, 2023 03:13 PM2023-06-01T15:13:47+5:302023-06-01T15:15:12+5:30

ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील टोल प्लाझा नजीक घडली.

Driver suffers heart attack in speeding truck; Accident caused by falling on face in cabin | धावत्या ट्रकमध्ये चालकाला हृदयविकाराचा धक्का; केबिनमध्ये तोंडावर उलटे पडल्याने झाला घात

धावत्या ट्रकमध्ये चालकाला हृदयविकाराचा धक्का; केबिनमध्ये तोंडावर उलटे पडल्याने झाला घात

googlenewsNext

खामगाव : धावत्या ट्रकमध्ये चालकाला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याने आपला ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला. त्याचवेळी हृदयविकाराचा धक्का आल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील टोल प्लाझा नजीक घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यवतमाळ जिल्ह्यातील राजू िकसनाजी मरस्कोल्हे वय ४९ रा. राळेगाव जि.यवतमाळ नामक चालक टीएस ०१ डीसी ५६८० क्रमांकाचा ट्रक घेऊन अकोलाकडे जात होते. दरम्यान, वाटेतच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी एका धाब्यावर ट्रक थांबविला. तितक्यात हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर केबीनमध्ये उलटे पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. चालक हृदयविकाराच्या धक्क्यानंतर तोंडावर उलटा पडल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय सुत्रांनी व्यक्त केली आहे. खामगाव अकोला रोडवरील टोल नाक्याजवळ घडलेल्या या घटनेची मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आल्यानंतर चालकाचा मृतदेह खामगाव येथील सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.
 

Web Title: Driver suffers heart attack in speeding truck; Accident caused by falling on face in cabin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.