प्रवासी वाहन चालक ‘ड्रेसकोड’मध्ये;  बुलडाण्यात ८० टक्के अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 06:03 PM2018-07-27T18:03:21+5:302018-07-27T18:05:47+5:30

बुलडाणा : काळी पिवळी, आॅटोरिक्षासह इतर प्रवासी वाहनचालकांना  ‘ड्रेसकोड’ सक्तीचा असतानाही त्याची अंमलबाजवणी होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले.

drivers in 'Dresscode'; 80 percent implementation in Buldhana | प्रवासी वाहन चालक ‘ड्रेसकोड’मध्ये;  बुलडाण्यात ८० टक्के अंमलबजावणी

प्रवासी वाहन चालक ‘ड्रेसकोड’मध्ये;  बुलडाण्यात ८० टक्के अंमलबजावणी

Next
ठळक मुद्देरिक्षाचालकांना खाकी किंवा पांढरा गणवेश व बॅच लावूनच रिक्षा चालवावी, असा  प्रादेशिक परिवहन विभागाचा नियम आहे. वाहनचालक ड्रेसकोडचा नियम पाळत नसल्याचा प्रकार बुलडाण्यासह, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा याठिकाणी दिसून आला. यासंदर्भात २४ जुलै रोजी ‘प्रवासी वाहनचालकांना गणवेशाची अ‍ॅलर्जी’ असे वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते.

वाहतूक पोलिस सतर्क
बुलडाणा : काळी पिवळी, आॅटोरिक्षासह इतर प्रवासी वाहनचालकांना  ‘ड्रेसकोड’ सक्तीचा असतानाही त्याची अंमलबाजवणी होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले. यासंदर्भात २४ जुलै रोजी ‘प्रवासी वाहनचालकांना गणवेशाची अ‍ॅलर्जी’ असे वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत अनेकठिकाणी वाहतूक पोलिस सतर्क झाले असून बुलडाण्यातील रिक्षाचालकांसह काळी पिवळी  वाहन चालक ड्रेसकोडमध्ये दिसून येत आहेत. 
रिक्षाचालकांना खाकी किंवा पांढरा गणवेश व बॅच लावूनच रिक्षा चालवावी, असा  प्रादेशिक परिवहन विभागाचा नियम आहे. मात्र जिल्ह्यात रिक्षाचालक, काळी पिवळी वाहन चालक या प्रवासी वाहनचालक ड्रेसकोडचा नियम पाळत नसल्याचा प्रकार बुलडाण्यासह, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा याठिकाणी दिसून आला. यासंदर्भात ‘लोकमत’ स्टिंग आॅपरशन राबविले असता  प्रवाशी वाहन चालकांकडून विविध नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आहे. तर मीटर रिक्षा चालविणारे कुठेच सापडले नाहीत. परिवहन विभागाने घालुन दिलेले नियम काळी पिवळी व रिक्षाचालकांकडून पाळले जात नसल्याचे चित्र दिसून आले. यावर ‘लोकमत’मध्ये ‘प्रवासी वाहनचालकांना गणवेशाची अ‍ॅलर्जी’ असे वृत्त प्रकाशीत केले असता या वृत्ताची दखल घेत वाहतूक पोलिसांनी नियमांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यात बुलडाणा शहरात रिक्षाचालकांसह काळी पिवळी  वाहन चालक ड्रेसकोड वापरत असल्याचे दिसून येत आहे. बुलडाण्यामध्ये जवळपास ८० टक्के प्रवासी वाहन चालक सध्या ड्रेसकोडमध्ये दिसून येत आहेत. त्याचबरोबर मेहकर, सिंदखेड राजा व लोणार शहरातही ड्रेसकोड संदर्भात वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना सुचना दिल्या आहेत. तर सिंदखेड राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार बळीराम गीते यांनी वाहन चालकांची बैठक घेवून त्यांना वाहतूक नियमांविषयी मार्गदर्श करणार असल्याचे सांगितले. 


वाहन चालकांना शिकविले नियम
‘लोकमत’मध्ये ‘प्रवासी वाहनचालकांना गणवेशाची अ‍ॅलर्जी’ असे वृत्त प्रकाशीत केले असता लोणार वाहतूक पोलिसांनी या वृत्ताखी दखल घेत लोणार शहरातील सर्व तीन चाकी व चार चाकी प्रवासी वाहन चालकांनी बैठक घेण्यात आली. लोणार पोलिस स्टेशनमध्ये  या वाहन चालकांना पोलिस निरिक्षक राजेंद्र माळी यांनी वाहतूक नियमांसंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षीतपणे करा व वाहतूक नियम मोडणाºयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरिक्षक राजेंद्र माळी यांनी यावेळी दिला.

Web Title: drivers in 'Dresscode'; 80 percent implementation in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.