उपेक्षितांचा ‘द्रोणाचार्य’
By admin | Published: September 5, 2014 12:22 AM2014-09-05T00:22:03+5:302014-09-05T00:22:03+5:30
खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील पेसोडे गुरूजी उपाख्य शंकर महाराज यांचे समाज घडविण्याचे व्रत.
अनिल गवई / खामगाव
शिक्षण क्षेत्रात गुणवंत.. हुशार.. विद्यार्थी मिळविण्यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेची धडपड आहे. इतकेच नव्हे तर दहावी-बारावी आणि इतर शैक्षणिक सत्राचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थी आपल्याच शिकवणी वर्गाचाच या अशी ह्यचोरीह्णही केली जात असताना, समाजातील उपेक्षित तो आ पला, या एकमेव ध्येयाने खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील पेसोडे गुरूजी उपाख्य शंकर महाराज यांनी समाज घडविण्याचे व्रत हाती घेतले आहे. आपल्या सृजनशील कृतीतून ह्यद बेस्ट आऊट ऑफ वेस्टह्ण या तत्वानुसार एक दोन नव्हे तर दीड हजारावर नापास मुलांच्या आयुष्यात त्यांनी नंदनवन फुलविले आहे.
परीक्षेत नापास झालेल्यांसोबतच समाजातील दुर्लक्षित व अवहेलना झालेल्या विद्यार्थ्यांंच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पेसोडे गुरूजी यांनी खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे १ जुलै २000 रोजी जागृती विद्यालयाची स्थापना केली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत नापास झालेल्यांना शैक्षणिक प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. ह्यतुला काय येत नाही, या पेक्षा तू काय करू शकतोह्ण, असा आ त्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे नापासांच्या शाळेतील अनेक विद्यार्थी आज सन्मानाने जीवन जगत आहेत. गुरूजींच्या सृजनशील विचारांमुळे अनेकांना पुढे शिकता आले. काही जणांना नोकरी लागली. काही उद्योजक..व्यापारी अन् काही शिक्षकही झालेत. तर काही गुरूजींच्या शाळेत विद्या र्थ्यांंंना घडविण्याचा वसा घेतला आहे. जागृतीच्या स्थापनेपासून आजपर्यंंंत दीड हजाराच्यावर नापास विद्यार्थ्यांंंच्या जीवनात आमुलाग्र बदल घडून आले आहेत.
निकालाबाबत बदललेल्या धोरणामुळे या नापासांच्या शाळेतील विद्यार्थ्यांंंची संख्या रोडावली असली तरी प्रत्येक नापास विद्यार्थ्यांंंच्या आयुष्यात ह्यहात आकाशाला जरूर टेकवा, पण पायाखालील जमीन न सोडताह्ण हा मंत्र रूजविण्यासाठी पेसोडे गुरूजी यांचे सुरू असलेले अविरत प्रयत्न ह्यतिमिरातून तेजाकडेह्ण नेणारे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंंना दज्रेदार शिक्षण देण्यासाठी जागृती ज्ञानपीठाची वाटचाल असून शेलोडी,टेभूर्णा, आंबेटाकळी येथील शाळांमध्ये १२00 च्यावर विद्यार्थी शिक्षणासोबतच नैतिकतेचे धडे गिरवित आहेत. इंग्रजी शिक्षणासोबतच संस्कृती जतन करण्यासाठी जागृती अग्रेसर आहे. आता पेसोडे गुरूजींची अध्यात्माकडे वाटचाल असून भागवत धर्माचा प्रचार-प्रचारासाठी ते अधिक वेळ देत आहेत.र्जमनी, युरोप खंडा तील काही देशांमध्ये श्रीमद् भागवत आणि राम कथांवर त्यांची २00 च्यावर प्रवचन झाली आहेत. अरुणाचल प्रदेशात तब्बल २0 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी शैक्षणीक क्षेत्रात घालविला आहे.