अवकाळी पावसाचा तडाखा

By Admin | Published: January 3, 2015 12:57 AM2015-01-03T00:57:49+5:302015-01-03T00:57:49+5:30

शेतकरी हवालदिल : मका, हरभरा, गहू, कांदा पिकांना फटका.

Drought | अवकाळी पावसाचा तडाखा

अवकाळी पावसाचा तडाखा

googlenewsNext

बुलडाणा : जिल्ह्यात बुधवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे धाड, मेहकर, बुलडाणा, जळगाव जामोद परिसरातील पिकांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला. गारपिटीमुळे संग्रामपूर, नांदूरा परिसरातील पिकांचे नुकसान झाले आहे.
मेहकर तालुक्यात बुधवार व गुरुवारला वादळीवार्‍यासह गारपीट व मुसळधार पाऊस झाला. यामध्ये काही भागातील शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी २ जानेवारी रोजी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
तालुक्याला काही भागात तुरळक तर काही ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसला. अकोला ठाकरे, खानापूर, खंडाळा देवी, खामखेड, उमरा, शहापूर, अंजनी बु., हिवरा साबळेसह इतरही भागात गारपीट झाली आहे. यामुळे हरभरा, गहू, मका, दादर, कांदा, मोहरी, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी त्रस्त असतांनाच या अवकाळी पावसाने पुन्हा शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पाडली. अकोला ठाकरे येथील शेतकर्‍यांचे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान २ जानेवारी रोजी आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, उपप्रमुख समाधान साबळे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, ग्रामसेवक घुगे, मंडळ अधिकारी लंबे उपस्थिती होती. यासंदर्भात आ. रायमुलकर यांनी जिल्हाधिकार्‍यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली. या नुकसानीचा त्वरित सर्व्हे करुन अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

*राहूल बोंद्रें यांच्यासह लोकप्रतिनिधींची भेट
अवेळी कोसळलेल्या अस्मानी संकटाचा प्रतिकार करणार्‍या शेतकर्‍यांच्या भेटीसाठी चिखलीचे आ.राहुल बोंद्रे, बांधकाम सभापती अंकुशराव वाघ, नंदकिशोर शिंदे, भगवान भोंडे, प्रमोद बोर्डे, म.शफीक, अनिल फेपाळे, एकनाथ धंदर, वरुडचे उपसरपंच संतोष राऊत, सोयगावचे सरपंच समाधान बुधवत, जामठीचे सरपंच मंगेश तायडे यांच्यासह प्रकाश पांडव, रंगनाथ बुधवत, रंगराव पिंपळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

Web Title: Drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.