सिंदखेड राजा पालिका निवडणुकीवर दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 03:02 PM2019-03-03T15:02:58+5:302019-03-03T15:03:05+5:30
सिंदखेड राजा: सिंदखेड राजा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतू या निवडणुकीवर सध्या दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. दुष्काळामुळे उमेदवारांकडून बॅनरबाजी किंवा कुठलाच खर्चीक पणा सध्या होताना दिसून येत नाही.
- काशिनाथ मेहेत्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा: सिंदखेड राजा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतू या निवडणुकीवर सध्या दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. दुष्काळामुळे उमेदवारांकडून बॅनरबाजी किंवा कुठलाच खर्चीक पणा सध्या होताना दिसून येत नाही.
पालिकेच्या निवडणुकीमध्ये नगर अध्यक्ष जनतेमधुन निवडल्या जाणार आहे. तर आठ प्रभागा मधून १७ सदस्य निवडून देण्यासाठी २४ मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर २५ मार्च रोजी मतमोजनी व निकाल घोषीत होणार आहे . २८ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून फक्त सन २००३ मध्ये जनतेमधून नगर अध्यक्ष पदासाठी सिंदखेड राजा नगर परिषदेची निवडणूक घेण्यात आली होती. तेंव्हा शिवसेनेच्या कमल मेहेत्रे नगर अध्यक्ष पदी निवडून आल्या होत्या. तर मागील वेळेस नगर परिषद निवडनुकीमध्ये सुध्दा १७ सदस्यांसाठी मतदान झाले होते.
तेंव्हा शिवसेनेचे नऊ, राष्ट्रवादी पक्षाचे सात व भारतीय राष्ट्रीय पक्षाचे एक असे उमेदवार निवडून शिवसेनेची सत्ता आली होती. मात्र अडीच वर्ष पूर्ण होताच राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेचे चार सदस्य फोडले व त्यांचे भरवशावर राष्ट्रवादी पक्षाचे अॅड. नाझेर काझी नगर अध्यक्ष पदावर कार्यरत राहीले. या सर्व घडामोडी मुळे शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या सदस्यांना आता या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष तीकीट देणार की शिवसेना, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सगळ्याच राजकीय पक्षामधे अंतर्गत कलह वाढत असून नगर अध्यक्ष पदासाठी कोण ऊमेदवार राहणार याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. आज पर्यंत शिवसेना भाजपची युती संदर्भात तसेच राष्ट्रवादी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युती संदर्भात अधिकृत बैठका झाल्या नाहीत. दुष्काळाची परिस्थिती असून निवडणुकांमध्ये लागणारे पोस्टर, ईतर साहीत्य, पैसा या मुळे जानकार लोक निवडणुकीच्या चक्रात पडताना दिसत नाहीत. तर काही लोकांचा राजकारण हा व्यवसाय झाल्यामूळे ईतरांना ते न झेपवणारे आहे. सध्यातरी सर्व पक्षातील नेते एकमेकांपासून दूर दिसत असले तरी एकमेकांचे गळ्यात गळा घालुन जनते समोर येणार यांत शंकाच नाही.