बुलडाणा जिल्ह्यातील तणावग्रस्त शेतकर्यांना दुग्ध व्यवसायाचा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:50 AM2017-11-25T01:50:59+5:302017-11-25T01:55:23+5:30
सातत्याने निर्माण होणारी अवर्षणसदृश स्थिती, बदलते हवामान, यामुळे कृषी जगतासमोर मोठय़ा समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अशा स्थितीत शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत असून, असंख्य शेतकरी तणावात आले आहेत.
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सातत्याने निर्माण होणारी अवर्षणसदृश स्थिती, बदलते हवामान, यामुळे कृषी जगतासमोर मोठय़ा समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अशा स्थितीत शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत असून, असंख्य शेतकरी तणावात आले आहेत. अशा शेतकर्यांना शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून अर्थार्जनासाठी हा तभार लागावा, यासाठी दुग्धोत्पादनाला शासनातर्फे चालना दिली जात असून, पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ३0१ लाभार्थी शेतकर्यांना दुधाळ जनावरे घेण्यासाठी ६२ लाख ११ हजार ६२४ रुपये निधी देण्यात आला आहे. त्यामुळे तणावग्रस्त शेतकर्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे.
निसर्गातील अनियमिततेचा शेती व्यवसायाला मोठा फटका बसून उत्पादनात घट होत आहे. त्यात बाजारपेठेत शेतमालास भाव मिळत नसल्यामुळे शे तकर्यांवरील कर्ज वाढून त्यांच्या आत्महत्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशा तणावग्रस्त शेतकर्यांना आधार मिळावा, शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त. अशा उपक्रमापैकी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे तणावग्रस्त शे तकर्यांना दुधाळ जनावरांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे विशेष घटक योजना व ओटीएसपी योजनां तर्गत ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे, शेळीचे वाटप करण्यात आले. यावर्षी २0१६-१७ या आर्थिक वर्षात ३१६ लाभार्थींना दुधाळ जनावरे, २७८ लाभार्थींना शेळीसाठी अनुदान देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी १५८ लाभार्थींना दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी ६३ हजार ७९६ रुपयांप्रमाणे १0 लाख ७९ हजार ७६८ रुपये अनुदान, तसेच १४३ लाभार्थींना शेळ्यांसाठी प्र त्येकी ३५ हजार ८८६ रुपयेप्रमाणे ५१ लाख ३२ हजार ६९८ रुपये अनुदान देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील काही तणावग्रस्त शेतकर्यांना दुग्ध व्यवसायाचा आधार मिळाला असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
आर्थिकदृष्ट्या परवडणारा व्यवसाय
शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्त्वाचा व्यवसाय असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडणारा आहे. आहारामध्ये प्रत्येकाला प्रतिदिनी ३00 मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येसाठी दुधाचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. आपल्याकडे गाईपासून ४५ टक्के तर म्हशीकडून ५२ टक्के दूध मिळते; पण यात सध्या उलटे चित्र आहे. दुधामध्ये पाणी, कबरेदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्याने दूध हे पूर्णान्न आहे. गाईच्या एक लीटर दुधातून ६00 किलो कॅलरीज, तर म्हशींच्या एक लीटर दुधापासून १000 किलो कॅलरीज मिळता त.