दुष्काळी पॅकेजची मदत दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:42 PM2019-02-27T13:42:25+5:302019-02-27T13:42:34+5:30

बुलडाणा: अवर्षणाचा फटका बसलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दीड लाख शेतकर्यांच्या खात्यात ६७ कोटी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली.

Drought package help to 1.5 lakh farmer's account | दुष्काळी पॅकेजची मदत दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात

दुष्काळी पॅकेजची मदत दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात

Next

बुलडाणा: अवर्षणाचा फटका बसलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ६७ कोटी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात प्राप्त ५९ कोटी रुपये व नंतर पुन्हा ५९ कोटी रुपये असे ११८ कोटी रुपये बुलडाणा जिल्ह्याला प्राप्त झाले होते. तिसर्या टप्प्यात ८१ कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून येत्या दोन दिवसात या रकमेचेही वाटप केले जाणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आठ तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला होता. या तालुक्यातील ८३४ गावे दुष्काळाच्या कचाट्यात सापडले होते. केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी २८८ कोटी रुपयांची मदत मागण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५९ कोटी रुपये बुलडाणा जिल्ह्याला देण्यात आले होते. त्यानंतर लगेच दुसरा हप्ताही ५९ कोटी रुपयांचा जिल्ह्याला मिळाला होता. अशा १८८ कोटी रुपयांच्या वाटपासाठी ८३४ गावांपैकी ५९९ गावांतील एक लाख ९८ हजार सहा शेतकर्यांच्या याद्याही मदतीच्या वाटपासाठी तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या पैकी आतापर्यंत एक लाख ५९ हजार २१८ शेतकर्यांच्या खात्यात ६७ कोटी १० लाख ८९ हजार ८३८ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. वार्षिक सरासरीच्या २३ टक्के पाऊस जिल्ह्यात कमी पडला होता. पडणारा पाऊसही कमीत कमी ९ ते अधिकाधिक २३ दिवासापर्यंतचा खंड देत पडल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामाला मोठा फटका बसला होता. या पृष्ठभूमीवर केंद्रीय पथकाने पाहणी केली होती. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तीव्र आंदोलनेही झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला होता. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना दुष्काळातील नुकसान भरपाईपोटी २८८ कोटी रुपायंची अवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले होते.
या पृष्ठभूमीवर पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला ५९ कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान वाटपासाठी मिळाले होते. त्यानंतर दुसरा हप्ताही ५९ कोटी रुपयांचा मिळाला होता. त्यामुळे जवळपास १८८ कोटी रुपयांपैकी ६७ कोटी दहा लाख रुपयांचे एक लाख ५९ हजार २१८ शेतकर्यांच्या खात्यात दुष्काळी नुकसानापोटी ही मदत जमा करण्यात आली आहे. प्राप्त निधीपैकी ५७ टक्के निधीचे वाटप आतापर्यंत करण्यात आलेले आहे. उर्वरीत ८९ कोटी रुपयांची अद्याप जिल्ह्याला प्रतीक्षा आहे.


तिसऱ्या टप्प्यात ८१ कोटी
४दरम्यान, दुष्काळी पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्याला तिसर्या टप्प्यात आणखी ८१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असून येत्या दोन ते तीन दिवसात त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. २८८ कोटी रुपयांपैकी १९९ कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.
तीन तालुक्यात ६० टक्के निधी वाटप
४जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात ८० टक्के दुष्काळी मदत वाटप करण्यात आली असून २५ हजार ४३१ शेतकर्यांच्या खात्यात ती जमा झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातही ७० टक्के मदत वाटप झाली असून २८ हजार ७९६ शेतकर्यांच्या खात्यात ११ कोटी २२ लाख ३१ हजार ६८६ रुपये जमा करण्यात आले आहे तर मलकापूर तालुक्यातील १३ हजार ८१७ शेतकर्यांच्या खात्यात ६८ कोटी १८ लाख चार हजार ७२३ रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे.

Web Title: Drought package help to 1.5 lakh farmer's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.