पाच तालुक्यात दुष्काळी मदतीची आशा धूसर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 03:03 PM2019-04-17T15:03:11+5:302019-04-17T15:03:15+5:30
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना असलेली दुष्काळी मदतीची आशा धूसर होत चालल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना असलेली दुष्काळी मदतीची आशा धूसर होत चालल्याचे चित्र आहे.
पहिल्या यादीत समावेश असलेल्या तालुक्यांमधिल शेतकऱ्यांनाच सध्या दुष्काळी मदत निधीचे वितरण झाले आहे. त्यामुळे जळगाव जामोद तालुक्यातील विविध गावांसह पाच तालुक्यांमधिल शेतकºयांची आशा मावळण्याची चिन्हे आहेत.
गत खरिप हंगाम हातून गेल्याने राज्य शासनाने प्रथम १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. यानंतर उर्वरित तालुक्यांमधूनही ओरड झाली. परिणामी दोन टप्प्यात उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांना हेक्टरी ६८०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. ही मदत दोन टप्प्यात देण्याचे ठरले. त्यानुसार १५१ तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळग्रस्त निधीचा पहिला हप्ता मंजूर होवून वितरित झाला. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यापैकी आठ तालुके १५१ दुष्काळी तालुक्याच्या यादीत आले होते. परंतु पाच तालुक्यांचा मात्र त्यामध्ये समावेश नव्हता. त्यानंतर पाच तालुक्यातील काही महसूल मंडळे दुष्काळग्रस्त जाहीर झालीत. आणि शेवटच्या टप्प्यात उर्वरित महसूल मंडळांचा समावेश दुष्काळी म्हणून करण्यात आला.
दुष्काळी मदत त्यांना मिळालीच नाही. सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने उर्वरित शेतकरी या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या तालुक्यांमधिल शेतकºयांचा परिस्थिती गंभीर!
जिल्ह्यातील जळगाव जामोद, बुलडाणा, चिखली, मेहकर व देऊळगाव राजा या पाच तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत सर्वात शेवटी करण्यात आला होता. परंतु दुष्काळी निधी वितरणाबाबत अद्याप या पाच तालुक्यांसाठी काहीही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे.