आॅनलाईन विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांचा एल्गार

By admin | Published: June 1, 2017 12:12 AM2017-06-01T00:12:51+5:302017-06-01T00:12:51+5:30

केंद्र सरकार आॅनलाइन औषध विक्रीस कायदेशीर मान्यता देण्याच्या दृष्टीने तयारी करीत आहे. शासनाने पब्लिक नोटिस जाहीर करून सूचना व मार्गदर्शन मागविले आहे.

Drug vendors against online sales | आॅनलाईन विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांचा एल्गार

आॅनलाईन विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांचा एल्गार

Next

कडकडीत बंद : अप्परजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र सरकार आॅनलाइन औषध विक्रीस कायदेशीर मान्यता देण्याच्या दृष्टीने तयारी करीत आहे. शासनाने पब्लिक नोटिस जाहीर करून सूचना व मार्गदर्शन मागविले आहे. ई - पोर्टलद्वारे औषधे खरेदी विक्रीच्या धोरणाविरोधात देशभरातील ८.५0 लाख, तर राज्यातील ५0 हजार औषध विक्रेत्यांनी ३0 मे रोजी एक दिवसीय बंद पाळून निषेध नोंदविला आहे. याबाबत अप्परजिल्हाधिकारी के.आर परदेशी यांना जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे
विविध संघटना तसेच जिल्हा संघटना व वैयक्तिक औषधी विक्रेता यांच्या माध्यमातून जवळपास ५0 हजारांपेक्षा जास्त हरकती व सूचना सरकारकडे दाखल झाल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करता संघटनेद्वारा आॅनलाईन फार्मसीला विरोध म्हणून केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने विरोध म्हणून ३0 मे रोजी एक दिवसाचा कडकडीत बंद पाळून शासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सौरभ मालाणी, सचिव प्रमोद भारतीया, उपाध्यक्ष संजय शेळके, राजाभाऊ टांक, अजय ढोरे, प्रवीण देशमुख, दामोधर काळबांडे, मनोज हरवानी, मनोज डफळे, राजाभाऊ वानवाणी, सागर आंडे, तुषार कासट सहभागी झाले होते.

Web Title: Drug vendors against online sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.