तीन तालुक्यात ड्राय स्पेल, ऑगस्ट महिन्यात ६० टक्के पावसाची तूट

By विवेक चांदुरकर | Published: August 28, 2023 05:43 PM2023-08-28T17:43:23+5:302023-08-28T17:44:10+5:30

पावसाअभावी पिके सुकत असून जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. 

Dry spell in three taluks, 60 percent rainfall deficit in August | तीन तालुक्यात ड्राय स्पेल, ऑगस्ट महिन्यात ६० टक्के पावसाची तूट

तीन तालुक्यात ड्राय स्पेल, ऑगस्ट महिन्यात ६० टक्के पावसाची तूट

googlenewsNext

खामगाव : जिल्ह्यात तीन तालुक्यात २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला असून, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ ४० टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी १८७.३ मिमी असून, केवळ ७६.२ मिमी पाऊस झाला. तसेच पावसाचा खंडही पडला आहे. पावसाअभावी पिके सुकत असून जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. 

जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यामध्ये अल्प पाऊस झाला. सरासरीच्या केवळ २५ टक्केच पाऊस झाल्याने पेरण्या लांबल्या. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. २२ जुलैच्या दरम्यान जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. मलकापूर, जळगाव जामोद, नांदुरा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. जुलै महिन्यामध्ये जिल्ह्यात सरासरीच्या १४२ टक्के पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा पावसाचा खंड पडला. २७ ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस झाला नाही. सोयाबीन फुलोऱ्यावर असून पावसाची नितांत गरज आहे. मात्र, पावसाअभावी सोयाबीनसह सर्वच पिके संकटात सापडली आहेत. पिके सुकत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पिकांना जोरदार पावसाची गरज आहे.

महिना सरासरी पाऊस (मिमी) झालेला पाऊस (मिमी) टक्के
जून १३९.३ ३५.१ २५.२
जुलै १९२.२ २७३.४ १४२.२
ऑगस्ट १८७.३ ७६.२ ४०.७

वर्हाडातही पावसाची तूट
बुलढाणा जिल्ह्यासोबतच वर्हाडातही पावसाची तूट आहे. अकोला जिल्ह्यात आॅगस्टपर्यंत ६४.८ टक्के पाऊस झाला आहे. तसेच वाशिम जिल्ह्यात ८१.५ टक्के तर अमरावती जिल्ह्यात ६३.१ टक्के पाऊस झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या जिल्ह्यात १०७.२ टक्के पाऊस झाला आहे.

जिल्हा सरासरी पाऊस ऑगस्टपर्यंतचा पाऊस
बुलढाणा ५१८.८ मिमी ७४.२ टक्के
अकोला ५५४.७ मिमी ६४.८ टक्के
वाशिम ६२३.३ मिमी ८१.५ टक्के
अमरावती ६८०.९ मिमी ६३.१ टक्के
यवतमाळ ६४९.७ मिमी १०७.२ टक्के

एक जूनपासून ते २८ ऑगस्टपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. ५१८.८ मिमी पाऊस व्हायला हवा होता. ३८४.७ मिमी झालाआहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी १८७.३ लिमीटर पाऊस होत असतो पण ७६.२ मिमी झाला आहे. तसेच पावसाचा खंडही पडला आहे.
- डाॅ. विकास जाधव
शास्त्रज्ञ, कृषिविज्ञान केंद्र, जळगाव जामोद

Web Title: Dry spell in three taluks, 60 percent rainfall deficit in August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.