प्लास्टिकच्या अतिरेकामुळे गोधन संकटात!
By Admin | Published: April 15, 2015 12:57 AM2015-04-15T00:57:41+5:302015-04-15T00:57:41+5:30
मलकापूर येथे प्लास्टिकमुक्त शहर ही संकल्पना राबविण्याची गरज.
मनोज पाटील / मलकापूर (जि. बुलडाणा ) : प्लास्टिकच्या अति वापरामुळे गायी-म्हशी या पाळीव प्राण्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीने मुक्या जीवांचे प्राण वाचविण्याकरिता मलकापूर शहरात प्लास्टिमुक्त शहर ही योजना राबविणे गरजेचे झाले आहे. शहरात पाळली जाणारी ही जनावरे मोकाट असताना अस्ताव्यस्त पडलेले प्लास्टिक गिळंकृत करतात अथवा घरातील शिळे अन्न जेथे टाकल्या जाते ते खाताना प्लास्टिकच्या कॅरीबॅगही ते सेवन करतात. प्लास्टिक पोटात गेल्याने त्यांची पचन प्रक्रिया बिघडून परिणामत: त्यांचा जीवही जातो. पारिवारिक लग्न सोहळे, भंडारे आयोजित करताना प्लास्टिक पत्रावळ्या, थर्माकॉलचे द्रोण, प्लास्टिक ग्लासही वापरानं तर एका मोठय़ा प्लास्टिक पिशवीत एकत्र केली जातात. या सर्व पिशव्या गावाबाहेर फेकल्या जातात अथवा कार्यक्रमस् थळाच्या बाहेरच सोडल्या जातात. या उकिरड्यावर मोकाट जनावरे अन्नाच्या शोधात पटकन भिडतात. शिळे अन्नपदार्थ खाताना अनावश्यक असलेली प्लास्टिकही ते सेवन करतात. बसस्टॅण्ड परिसर, आठवडी बाजार समिती आवर, न.प. पाणी पुरवठा विभागातील प्रवेशद्वारासमोरील मोकळा परिसर अशा ठिकाणी नेहमी असे प्लास्टिक ढिगारे अन् त्याभोवती जमलेली मोकाट जनावरे दृष्टीस पडतात. ४0 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्यांना बंदी आहे. कचरावेचकही या पिशव्या उचलत नाहीत. या पिशव्यांवर पुनप्र्रक्रिया होत नाही. त्यामुळे या पिशव्या उघड्यावर टाकल्या जातात. या पिशव्या अन्नपदार्थांंच्या संपर्कात आल्याने त्या गुरे-ढोरे फस्त करतात. या बाबीकडे अद्यापही गांभीर्याने पाहिल्याच जात नसल्याने गायी-म्हशींच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांचे आयुष्यमान कमी होत आहे.