एसटी भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 04:37 PM2018-06-17T16:37:26+5:302018-06-17T16:37:26+5:30

भाडेवाढीत काही प्रमाणात अन्याय झाल्याच मत व्यक्त होताना दिसत असून मलकापूर तालुक्यात त्याविषयी काही प्रवाशात राजीचा तर काही प्रवाशात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. 

Due to the increase in ST fares, the passengers are upset | एसटी भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

एसटी भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

Next
ठळक मुद्देएका वर्गात नव्याने झालेल्या एसटीच्या भाडेवाढीविषयी नाराजी प्रकट होताना दिसत आहे.एखाद्या गावचे एसटी भाडे या आधी १४ रु. होते ते आता २० रुपये आकारले जाईल.आता नवीन भाडेवाढ ही ५ रुपयांच्या पटीन झाल्याने त्यावर एसटी महामंडळाने तोडगा काढल्याच दिसत आहे.

- हनुमान जगताप
 
मलकापूर : राज्यभरात एसटीच्या प्रवास शुल्कात शनिवारपासून २८ टक्क्यांनी दरवाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदरची भाडेवाढ ५ रुपयांच्या पट्टीत करण्यात आल्याने प्रवास शुल्क ‘राऊंडफिगर’मध्ये आकारण्यात येईल. वर वर पाहता भाडेवाढ प्रवाशांच्या सोयीसाठी उपयुक्त वाटत असली तरी या भाडेवाढीत काही प्रमाणात अन्याय झाल्याच मत व्यक्त होताना दिसत असून मलकापूर तालुक्यात त्याविषयी काही प्रवाशात राजीचा तर काही प्रवाशात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. 
डिझेल दरवाढीच्या तसेच इतर कारणावरुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशी शुल्कात राज्यभरात १८ टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे. अर्थात विविध क्षेत्रात दिसागणीक होणाºया दरवाढीची नागरिकांना एकाअर्थी सवयच झाल्याने एसटीच्या दरवाढीविषयी प्रवाशात ‘यात नवल वाटण्याच कारण नाही’ अशा प्रतिक्रीया उमटताना दिसत आहेत.
१८ टक्क्यांनी दरवाढीचा परीणाम तालुक्यातून लांब पल्ल्यांच्या प्रवाशासाठी म्हणावा तसा परिणामकारक नसला तरी स्थानीय स्तरावर सामान्य नागरिक हा पै पै चा हिशोब ठेवण्याºया श्रेणीत मोडणारा असल्याने एका वर्गात नव्याने झालेल्या एसटीच्या भाडेवाढीविषयी नाराजी प्रकट होताना दिसत आहे.
राज्यभरात झालेली भाडेवाढ १८ टक्यांनी झाली असली तरी ती ५ रुपयांच्या पटीत झाली आहे. म्हणजे एखाद्या गावचे एसटी भाडे या आधी १४ रु. होते ते आता २० रुपये आकारले जाईल. एखाद्या गावचे भाडे १२ रुपये होते ते आता १० रुपये आकारले जाईल. एखाद्या गावचे भाडे १६ रुपये होते ते १५ रुपये आकारले जाईल. म्हणजेच भाड्यााची आकारणी आता ‘राऊंडफिगर’ मध्ये होईल, असे आगाराच्या सुत्रांशी झालेल्या चर्चेवरुन स्पष्ट होते. त्यामुळे मलकापूर तालुक्याविषयी सांगायच झाल्यास राज्यपरिवहन महामंडळाने एसटी प्रवास भाड्याविषयी काहींची राजी तर काही प्रवाशांची नाराजी असल्याच दिसतं.
 
त्या वादांना मिळणार विराम
एसटीची भाडेवाढ ‘राऊंडफिगर’ मध्ये  झाल्याने चिल्लरच्या मुद्दयावरुन प्रवाशी व वाहक यांच्यात मिनीटाला होणाºया वादांना विराम मिळण्याची शक्यता आहे. एरवी प्रत्येक बसमध्ये प्रवास लहाान असो किंवा मोठा वाहक आणि प्रवाशी यांच्यातील वाद नित्याचेच होत राहतात. आता नवीन भाडेवाढ ही ५ रुपयांच्या पटीन झाल्याने त्यावर एसटी महामंडळाने तोडगा काढल्याच दिसत आहे.

गावाचे नांव    आधीचे भाडे    आताचे भाडे
वडोदा                १४ रु.       १५ रु.
देवधाबा            १७ रु.        २० रु.
वरखेड              २० रु.       २५ रु.
दाताळा             १० रु.       १० रु.
जांबुळधाबा       १४ रु.      १५ रु.
धरणगाव         १४ रु.       १५ रु.
दसरखेड           १७ रु.      २० रु.
वाघोळा           १७ रु.      २० रु.
विवरा              १७ रु.      २० रु.
उमाळी           १४ रु.      १५ रु.

Web Title: Due to the increase in ST fares, the passengers are upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.