रस्त्यालगत नाली नसल्याने शेत पडले पडीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:59+5:302021-07-15T04:23:59+5:30
अमडापूर : रस्त्यालगत नाली नसल्याने पावसाने पाणी शेतात शिरत असल्याने पिंपरखेड येथील शेतकऱ्याचे शेत पडीक पडले आहे़. या ...
अमडापूर : रस्त्यालगत नाली नसल्याने पावसाने पाणी शेतात शिरत असल्याने पिंपरखेड येथील शेतकऱ्याचे शेत पडीक पडले आहे़. या रस्त्याचे पाणी नाली बांधून काढून देण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही़. त्यामुळे शेतात पेरणी करूच शकत नसल्याचे शेतकऱ्याने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़
चिखली तालुक्यातील पिंपरखेड येथील आनंदा उमाळे या शेतकऱ्याच्या शेतात रस्त्यावरील पावसाचे पाणी शिरत आहे़. त्यामुळे या शेतकऱ्याचे दाेन एकर शेत पेरणीलायक राहत नसल्याचे चित्र आहे़. त्यामुळे हे शेत पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. आनंदा उमाळे यांनी २९ जूनला चिखली तहसीलदार यांच्यासह कृषी अधिकारी, पाटबंधारे विभाग, सा. बां. विभाग याना निवेदन देऊन शेतात येणारे पाणी बंद करण्यासाठी मागणी केलेली आहे़; मात्र त्यांची दखल घेण्यात आलेली नाही़.
शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ
अमडापूर-जानेफळ रोडला लागून गट नं २ मध्ये उमाळे यांचे २ एकर शेत आहे़. या रोडचे पावसाचे सांडपाणी रोडच्या बाजूला नाली काढली नसल्याने हे पाणी पूर्णत: शेतात वाहत असल्याने शेतीची पेरणीच करता येत नाही़. शेतीतून उत्पादनच काढता येत नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे़. उपाययाेजना करण्यासाठी उमाळे यांनी विविध प्रशासनाकडे निवेदन दिले आहे़. मात्र त्याची दखल घेतलेली नाही़. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे़