महावितरणच्या सौभाग्य योजनेत मिटर तुटवड्याचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 06:18 PM2018-07-29T18:18:09+5:302018-07-29T18:21:29+5:30

मलकापूर: महावितरण कंपनीच्या मलकापूर उपविभागात मागील काळात नविन मिटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब शासनाच्या सौभाग्य योजनेत खोडा टाकणारी  ठरत आहे.

Due to lack of meter no electricity malkapur | महावितरणच्या सौभाग्य योजनेत मिटर तुटवड्याचा खोडा

महावितरणच्या सौभाग्य योजनेत मिटर तुटवड्याचा खोडा

Next
ठळक मुद्देमलकापूर तालुक्यातील शेकडो ग्राहकांनी विज कनेक्शनसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. सौभाग्य योजनेत नविन कनेक्शनसाठी नविन मिटरच उपलब्ध नाहीत.

- हनूमान जगताप
मलकापूर: महावितरण कंपनीच्या मलकापूर उपविभागात मागील काळात नविन मिटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब शासनाच्या सौभाग्य योजनेत खोडा टाकणारी  ठरत आहे. परिणामी शेकडो ग्राहकांची कनेक्शनची प्रतिक्षा कायमच आहे. महत्वाचं म्हणजे, या योजनेच्या उद्दीष्टपुर्तीसाठी जुनी मिटर लावण्याचा प्रपंच केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती असून  हा प्रकार ग्राहकांसाठी धोकादायक असाच आहे. 
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, विज चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाच्या वतीने वेगवेगळ्या योजना अमलात आणल्या जात आहेत. त्याचा भाग म्हणून राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने काही दिवसांपुर्वी प्रधानमंत्री सौभाग्य योजना अमलात आणण्यात आली. देशाच्या प्रत्येक घरात विज पोहचविण्याचा उद्देश त्यामागे आहे. गरीब कुटुंबांना मोफत विज कनेक्शन सौभाग्य योजनेत दिल्या जात असून जनगणनेच्या आधारावर लक्ष देण्यात येत आहे. त्या धरतीवर मलकापूर तालुक्यातील शेकडो ग्राहकांनी विज कनेक्शनसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. मात्र मलकापूर येथे नविन मिटरच उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर येत असून महावितरण कंपनीतील मिटरचा तुटवडा सौभाग्य योजनेत खोडा ठरत आहे. परिणामी परिसरातील शेकडो ग्राहकांची नविन कनेक्शनसाठी  प्रतिक्षा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान सौभाग्य योजनेत नविन कनेक्शनसाठी नविन मिटरच उपलब्ध नाहीत, अशा परिस्थिीतीत योजनेच्या उद्दीष्टपुर्तीसाठी नविन ग्राहकांना जुनेच भंगारात पडलेले मिटर  देण्याचा प्रपंच मलकापूर परिसरात सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. अशा परिस्थीतीत जुने मिटर ग्राहकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय जुने मिटर   पुन्हा एकदा अव्वाच्या सव्वा बिले द्यायला लागल्यास नविन वाद निर्माण होवू शकतो. त्या धर्तीवर नविन मिटराचा तत्काळ पाठपुरावा व्हावा, अशी मागणी होताना दिसते. 


चार महिन्यापासून प्रतिक्षा कायमच
मलकापूर उपविभागात सौभाग्य योजनेव्यतिरीक्त इतर ग्राहकांत मोडणाºया घरगुती, व्यावसायीक, शेतीपंप, अशा विविध ग्राहकांनी चार मन्यिापासून पैसे भरल्यावरही मिटर अभावी त्यांची नविन कनेक्शनची पतिक्षाच कायम असल्याने ग्राहकातून तिव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

मलकापूर उपविभागात नविन मिटरचा पुरवठा कमी आहे. त्यासाठी आमचा वरिष्टांकडे पाठपुरावा सुरू आहे. सौभाग्य योजनेच्या पुर्तीसाठी लवकरच नविन मिटर उपलब्ध होतील. ग्राहकांनाही लवकरात लवकर मिटर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अनिल शेगांवकर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी, मलकापूर.

Web Title: Due to lack of meter no electricity malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.