देयकाअभावी विकास आराखड्यातील कामे ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 02:01 PM2019-11-19T14:01:50+5:302019-11-19T14:02:11+5:30

शासनाने ठेकेदाराचे कुठलेच बील काढले नाही. त्यामुळे ठेकेदाराने ४ जून २०१९ रोजी काम बंद केले.

Due to lack of payment, the work of development plan is stalled! | देयकाअभावी विकास आराखड्यातील कामे ठप्प!

देयकाअभावी विकास आराखड्यातील कामे ठप्प!

Next

- काशिनाथ मेहेत्रे  
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा: मातृतीर्थ विकास आराखड्यातील ४० टक्के कामे झाल्यानंतरही देयके निघत नसल्याने येथील विकासाची कामे चार महिन्यापासून बंद पडलेली आहेत. येथील ऐतिहासीक वास्तूची दुरवस्था झालेली असून, जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यापूर्वी राजवाडा सुशोभीत होणार का? असा उपस्थित होत आहे.
मातृतीर्थ पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी आघाडी शासनाच्या कार्यकाळात गेल्या पाच वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने ३११ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला होता. त्यानंतर युतीच्या कार्यकाळात पहीला हप्ता १२ कोटी ९६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. २० जुलै २०१८ रोजी ठेकेदाराला कायार्रंभ आदेश देण्यात आला. ठेकेदाराने युध्दपातळीवर कामाल सुरवात देखील केली.
१९ जुलै २०१९ रोजी हे काम पूर्ण करावयाचे होते. मात्र शासनाने ठेकेदाराचे कुठलेच बील काढले नाही. त्यामुळे ठेकेदाराने ४ जून २०१९ रोजी काम बंद केले. त्यामुळे राजवाड्यात चोहीकडे दगडाचे ढीग पडले असून राजवाड्याची दुरावस्था झाल्याचे चित्र आहे.
तर राजवाड्या समोरील प्रांगणात नगर परिषदेने बगिचा व लॉनची व्यवस्था केली होती. त्याचीही दुरावस्था झाली आहे. १२ जानेवारी जिजाऊ जन्मोत्सवा पूर्वी सुशोभीकरण न झाल्यास पर्यटकांचा हिरमोड झाल्याशिवाय राहणार नाही. या विकास आराखड्यामध्ये निळकंठेश्वर महादेव मंदीर, रंगमहाल, काळाकोट, सावकार वाडा व लखोजीराव जाधव राजवाड्याचा समावेश आहे. ठेकेदाराने १५० कुशल कारागीरा मार्फत या कामाला सुरवात केली होती.
निवडणूकी पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते या कामाचा उद्घाटन सोहळा सुध्दा पार पडला. ठेकेदाराने ४० टक्के काम पूर्ण केले मात्र त्यानंतर देयके न निघाल्याने हे काम बंद केले.

पर्यटकांचा हिरमोड
राजवाड्या समोरील प्रांगणात नगर परिषदेच्यावतीने बगिचा व हिरवळ करण्यात आली होती. मात्र नगर परिषद प्रशासनाचे हिरवळ नष्ट झाली आहे. बगिचाची सुध्दा दुरावस्था झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतो.

Web Title: Due to lack of payment, the work of development plan is stalled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.