पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:55+5:302021-07-09T04:22:55+5:30

नुकतेच जमिनीवर आलेल्या पिकाची होत असलेली नासाडी कोरडवाहू शेतकरी उघड्या डोळ्याने पाहात आहेत. शेतातील कामधंदे बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील ...

Due to lack of rains, the crops were discarded | पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना

पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना

Next

नुकतेच जमिनीवर आलेल्या पिकाची होत असलेली नासाडी कोरडवाहू शेतकरी उघड्या डोळ्याने पाहात आहेत. शेतातील कामधंदे बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील मजूर ठाण मांडून घरी बसला आहे. पाऊस नसल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. येत्या चार-पाच दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागणार आहे.

यंदा वेळेवरच मान्सूनचे आगमन होईल व तो सरासरीपेक्षा जास्त पडणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. या अंदाजानुसार ७ जून ते १० जूनच्या दरम्यान मान्सूनच्या पावसाची सुरुवात झाली होती. त्यामुळे पावसाळा सुरू झाला, असे समजून शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु ही पिके जमिनीवर येत नाहीत, तोच पावसाने दडी मारली आहे.

जमिनीतील ओलावा होतोय नष्ट

दररोज कडक उन्ह पडत असल्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होत चालला आहे. पिकांना वाचवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी स्पिंक्लरद्वारे ठिंबक सिंचनचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे; परंतु ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही.

काही भागात पेरण्या रखडल्या

पावसाअभावी हजारो हेक्टरवरील पिकाच्या नुकसानाची शक्यता आहे. तर काही भागात अद्यापही काही पेरण्या रखडल्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी केली. अशा हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांनी खाली माना टाकण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Due to lack of rains, the crops were discarded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.