रस्त्याअभावी साेयाबीन शेतातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:16+5:302021-02-07T04:32:16+5:30
पिंपळगाव सराई : शेतरस्ता नसल्याने चार महिन्यांपासून साेयाबीन शेतातच आहे. शेतात मळणीयंत्रही नेता येत नसल्याने शेतकरी संकटात सापडला ...
पिंपळगाव सराई : शेतरस्ता नसल्याने चार महिन्यांपासून साेयाबीन शेतातच आहे. शेतात मळणीयंत्रही नेता येत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे रस्ता देण्याची मागणी अशाेक इंगळे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास उपाेषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
पिंपळगाव सराई येथील शेतकरी अशोक इंगळे यांची गट नंबर २२४ मध्ये चाळीस आर शेती आहे. परंतु या जमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ते रबीची पेरणी करू शकले नाही. रस्ता खुला करण्यासाठी इंगळे यांच्या मुलाने तहसीलदारांकडे अर्ज केला आहे. परंतु चार महिने उलटल्यानंतरही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. रस्ता नसल्याने साेयाबीन शेतातच आहे. मळणीयंत्र शेतात जाऊ शकत नसल्याने साेयाबीन काढताही येत नसल्याने अशाेक इंगळे हे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे, हा रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.