तूर डाळीला एक किलोच्या र्मयादेमुळे शिधापत्रिकाधारक अडचणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:57 AM2018-02-06T00:57:28+5:302018-02-06T00:59:19+5:30
बुलडाणा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ, साखर याबरोबच तूर डाळही वितरीत केल्या जाते; मात्र तूर डाळ वितरणासाठी प्रति कार्ड १ किलोचीच र्मयादा ठेवण्यात आली आहे, तसेच बाजार भावापेक्षा केवळ १0 रुपयाने कमी भाव असून, जास्त सदस्य संख्या असलेल्या कुटुंबाला एक किलोच तूर डाळ भेटत असल्याने शिधापत्रिकाधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

तूर डाळीच्या वाढत्या दरामुळे तुरीचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांनासुद्धा तूर डाळीपासून वंचित रहावे लागते. तूर डाळीच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसू नये, तसेच सर्वसामान्यांना तूर डाळ रास्त भावात उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तूर डाळ वितरीत करण्याचा निर्णय गेल्या दोन वर्षांपूर्वी घेतला होता. यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भावात एक किलो तूर डाळ देण्यात येते. एका शिधापत्रिकेवर दोन सदस्य संख्या असो किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य संख्या असली तरी शिधापत्रिकाधारकांना मिळणारी ही तूर डाळ प्रति कार्ड एक किलोच मिळते.
बाजारात तूर डाळीला सध्या ६५ रुपये प्रति किलो भाव असताना शिधापत्रिकाधारकांसाठी केवळ १0 रुपये किलोमागे कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना आताही एका किलोसाठी ५५ रुपये मोजावे लागत आहेत.
तूर डाळ घेण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना एक किलोची र्मयादा असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना एक किलो तूर डाळीवर एक महिना काढावा लागत आहे.