उपाययाेजनांमुळे काेराेना रुग्णसंख्या आटाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:32 AM2021-03-06T04:32:19+5:302021-03-06T04:32:19+5:30
माेताळा : जिल्हाभरात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे काही तालुक्यांमध्ये ठाेस उपाययाेजना केल्याने काेराेना रुग्णसंख्या आटाेक्यात ...
माेताळा : जिल्हाभरात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे काही तालुक्यांमध्ये ठाेस उपाययाेजना केल्याने काेराेना रुग्णसंख्या आटाेक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
मागील एक वर्षापासून जीवघेण्या कोरोनाच्या आजाराने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या संसर्गाने बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यातही तशी कमी नाही. दिवसागणिक शेकडोंच्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. कोरोना संसर्गित रुग्णसंख्येचा आकडा दररोज चारशेच्या खाली यायला तयार नाही. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. परंतु मोताळा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. तालुक्यात मागील ११ महिन्यांत ७ हजार ३५० इतक्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही नाममात्र ६०५ एवढी आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच शहरात आतापर्यंत ९७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना कोविड सेंटरमधून सुट्टी देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात तालुक्यात १ हजार ७२१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये केवळ ४२ रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आढळून आले असून त्याच्या टक्केवारीचे प्रमाण २.४ इतके असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तालुक्यातील काही अपवाद वगळता बाकी नागरिकांनी पाळलेले कोरोनाचे नियम व तालुका प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया तालुका आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नियमांचे काटेकोरपणे पालन करावे
तालुक्यातील नागरिकांनी विनामास्क व विनाकामी न फिरता सॅनिटायझरचा वापर करीत फिजिकल डिस्टन्स पाळून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून बाहेर जाणे टाळावे, असे मत डॉ. अरशद युसूफ यांनी व्यक्त केले आहे.