वाघ दिसल्याने शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण
By admin | Published: October 23, 2016 01:37 AM2016-10-23T01:37:42+5:302016-10-23T02:38:02+5:30
वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी.
लोहगाव महागाव, दि. २२- गावच्या पूर्व दिशेला उकर्डा शिवारात धरणाजवळ २0 ऑक्टोबर रोजी वाघ दिसल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोहगाव येथून तीन कि.मी. अंतरावर येत असलेल्या उकर्डा धरणाजवळील शेतामध्ये सोयाबीन हंगाम जोरात सुरू असून, शेतकरी व मजूर सकाळीच काम करण्यासाठी शेतात जातात आणि संध्याकाळी घरी येतात. २0 ऑ क्टोबर रोजी लोहगाव येथील शेतकरी पवन प्रकाश राठोड हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात संध्याकाळपर्यंंत काम करून घरी येत असताना धरणाजवळच त्यांना दोन वाघाचे पिल्ले व वाघीन दिसली. वाघाच्या पिल्लांनी त्यांच्यावर चाल केल्याने ते सर्व घाबरले व लगेच गाडी परत शेताकडे वळविली. शेजारील शेतात काम करणारे त्यांचे ना तेवाईक व मजूर हे घरी येत होते. त्यांना सर्व माहिती दिली. लगेच त्यांनी गावात फोन करून गावकर्यांना बोलाविले. गावातील मंडळी ट्रॅक्टर, मोटारसायकल घेऊन ताबडतोब धरण गाठले. त्या वेळेपर्यंंंत वाघ तेथून जवळ पासच्या शेतात गेले असावे. आता या भीतीपोटी मजूर व शेतकरी धरणाजवळील शेतात काम करण्यासाठी घाबरत आहेत. तरी वन विभागाने याची पाहणी करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व शे तमजूर करीत आहेत.