शेतात ट्रॅक्टर फिरविल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

By admin | Published: July 5, 2017 12:14 AM2017-07-05T00:14:12+5:302017-07-05T00:14:12+5:30

एका गटातील ४ आरोपींना तर दुसऱ्या गटातील २ आरोपींना कोठडी

Due to the reason behind the tractor rotation in the field, two groups of clashes | शेतात ट्रॅक्टर फिरविल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

शेतात ट्रॅक्टर फिरविल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : शेतात ट्रॅक्टर फिरविल्याच्या कारणावरून हातातील काठ्या व लोखंडी पाईप कुऱ्हाड व तलवारीने मारहाण होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील नेकनामपूर येथे सोमवारी घडली. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी दोन्ही गटातील ६ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता या आरोपींना ७ जुलैपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.
याबाबत नेकनामपूर येथील गुलाबराव रामचंद्र यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, देविदास अगळते, मोहन अगळते, साहेबराव अगळते, चंचल अगळते, अमोल अगळते, अरूण अगळते, सचिन अगळते, विजय संतोष अगळते, पुंडलिक शेषराव अगळते यांनी गैरकायदेशीरपणे मंडळी जमवून शेतात ट्रॅक्टर फिरविल्याच्या कारणावरून त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून मारहाण केली व गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाच्या फिर्यादीवरून वरील १० आरोपींवर तामगाव पोलिसांनी कलम ३०७, ३२४, ५०४, १४३, १४७, १४८, १४९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या गटातील अनिता साहेबराव अगळते यांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीत म्हटले आहे की, गुलाब रामचंद्र अगळते, पंजाबराव अगळते, गौरव अगळते, रामचंद्र किसन अगळते, बाबुराव हरीचंद्र अगळते, प्रमोद हरीचंद्र अगळते यांनी गैरकायदेशीरपणे मंडळी जमवून घरासमोर जाऊन म्हणाले की, तुमच्या घरातील सांडपाणी माझ्या घराकडे येते तुमच्या मुलाने माझे शेतात ट्रॅक्टर का फिरविले व त्याच्या हातातील काठीने उजव्या हातावर मारहाण केली. तसेच इतर नातेवाईकांना लोखंडी पाईप आणि लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून वरील ७ आरोपींवर कलम ३२६, ३२४, ५०४, १४३, १४७, १४८, १४९ नुसार गुन्हा दाखल केला असून दोन्ही गटातील ६ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सहा आरोपींना ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Due to the reason behind the tractor rotation in the field, two groups of clashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.