धा.बढे येथील शेतकर्‍याची आत्महत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:18 AM2017-10-02T01:18:40+5:302017-10-02T01:21:19+5:30

Due to suicide of the farmer | धा.बढे येथील शेतकर्‍याची आत्महत्या  

धा.बढे येथील शेतकर्‍याची आत्महत्या  

Next
ठळक मुद्देझाडाला  दोरीच्या सहाय्याने  गळफास लावुन आत्महत्याकर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपविल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगावबढे: येथील एका  शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून आ त्महत्या केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील येथील ६५ वर्षीय  जगन्नाथ नथ्थु जाधव यांचेकडे ४ एकर शेत असुन सततची  नापिकी व  एक लाखा पयर्ंत असलेले कर्ज या विवंचनेत त्यांनी  ३0 सप्टेंबराच्या रात्री घर सोडले. दरम्यान सकाळी घरात   नसल्याने लक्षात आल्यामुळे मुले व नातेवाईकांनी दसरा सण  असताना त्यांचा परिसरात  शोध घेतला.  दरम्यान दुसर्‍या दिवशी  १ ऑक्टोबर रोजी पुन्हा शेतात शोध घेतला असता जगन्नाथ  जाधव यांनी स्वत: चे शेतात निंबाचे झाडाला  दोरीच्या सहाय्याने  गळफास लावुन आत्महत्या केल्याचे नातेवाईक  अमोल शहाणे  यांना  दिसले. याबाबत फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांनी  आमस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.  

Web Title: Due to suicide of the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.