तांत्रिक बिघाड झाल्याने स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 02:03 PM2019-02-11T14:03:29+5:302019-02-11T14:04:46+5:30

खामगाव : एसबीआय बँकेतील तांत्रीक अडचणीमुळे धनादेश वटविण्यासाठी विलंब होत असल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहे.

Due to technical difficulties, SBI's bank stopped |  तांत्रिक बिघाड झाल्याने स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प

 तांत्रिक बिघाड झाल्याने स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प

Next

-  योगेश फरपट 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : एसबीआय बँकेतील तांत्रीक अडचणीमुळे धनादेश वटविण्यासाठी विलंब होत असल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहे. धनादेश स्कॅन करणारी मशिन बंद पडल्याने ही अडचण उद्भवली असल्याचे बँकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
खामगाव येथे मोठ्या प्रमाणात उद्योग चालतात. त्यामुळे दैनंदिन कोट्यवधीची आर्थीक उलाढाल याठिकाणी होत असते. व्यापारी प्रामुख्याने धनादेशाद्वारे व्यवहार करीत असतात. गेल्या आठवडाभरापासून स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील धनादेश स्कॅन करणारी मशिन बंद पडली आहे. त्यामुळे एसबीआय प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था म्हणून धनादेश मलकापूर येथील स्टेट बँकेत केली आहे. त्याठिकाणी ग्राहकांचे धनादेश स्कॅन करून काम भागविले जात आहे. यात मात्र तीन ते चार दिवसांचा अवधी लागत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांचे धनादेश बाऊन्स झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. पहिल्या दोन तीन दिवसात ग्राहक याबाबत अनभिज्ञ होते. मात्र अनेकांच्या तक्रारी वाढल्याने हा प्रकार समोर आला. दरम्यान, या मुळे बँकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


कोणत्याही व्यवहारासाठी आम्ही समोरच्या पार्टीला धनादेश देतो. मात्र ही अडचण निर्माण झाल्याने मोठे आर्थीक नुकसान होत आहे.
- निखील संतोष डिडवाणी, उद्योजक, महाराजा मसाला

मुख्य शाखेतील धनादेश स्कॅन करणाऱ्या मशिनमध्ये बिघाड झाली आहे. त्यामुळे विलंब होत आहे. सध्या मलकापूर येथून धनादेश स्कॅन करीत आहोत.
- राजेंद्रकुमार सुधांशू,
बँक मॅनेजर, एसबीआय खामगाव

Web Title: Due to technical difficulties, SBI's bank stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.