अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:39 AM2021-02-20T05:39:22+5:302021-02-20T05:39:22+5:30
डाेणगाव परिसरात १६ फेब्रुवारीपासून हवामानात बदल जाणवत होता. हवामानतज्ज्ञांनीही पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गुरुवार, १८ फेब्रुवारी राेजी ...
डाेणगाव परिसरात १६ फेब्रुवारीपासून हवामानात बदल जाणवत होता. हवामानतज्ज्ञांनीही पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गुरुवार, १८ फेब्रुवारी राेजी सकाळपासूनच आकाश ढगाळलेले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटांसह पावसाला प्रारंभ झाला. सुमारे १० मिनिटे जोरदार सरी कोसळल्या. नंतर हलक्या सरी तासभर येत होत्या. सध्या परिसरात हरभऱ्याचा हंगाम सुरू आहे. सोंगलेला हरभरा शेतात पसरलेला आहे. काही शेतकऱ्यांनी सोंगणी केलेल्या हरभऱ्याची गंजी लावलेली होती. धावपळ करून ती गंजी ताडपत्रीने झाकली, मात्र पसरलेला माल भिजला. या पावसाने शेतकऱ्याची फजिती केली. सुमारे दीड तास पाऊस येत होता. डोणगाव येथे ५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली.