टाकाऊपासून टिकाऊ इको फ्रेण्डली कार्यशाळा

By admin | Published: July 13, 2014 11:45 PM2014-07-13T23:45:15+5:302014-07-13T23:45:15+5:30

लोकमत सखी मंच हीच संकल्पना घेऊन आपल्यासाठी घेऊन येत आहे 'टाकाऊपासून टिकाऊ कार्यशाळा'

Durable Eco Frindley Workshop | टाकाऊपासून टिकाऊ इको फ्रेण्डली कार्यशाळा

टाकाऊपासून टिकाऊ इको फ्रेण्डली कार्यशाळा

Next

(प्रतिनिधी)



बुलडाणा : एखादी कलाकृती बघून अनायास तोंडातून वाह शब्दाचा उच्चार होतो आणि अशी कलाकृती टाकाऊ वस्तुपासून नाममात्र खर्चात तयार झालेली असेल तर कलाकृती सोबतच कलाकृती बनविणार्‍या कलाकारांचे कौतुक करावेसे वाटते.
लोकमत सखी मंच हीच संकल्पना घेऊन आपल्यासाठी घेऊन येत आहे 'टाकाऊपासून टिकाऊ कार्यशाळा' ज्यात झी टिव्ही मराठी फेम निता बोबडे नैसर्गिकरित्या निरूपयोगी असलेल्या वस्तुंपासून उपयोगी वस्तु कमीत कमी खर्चात कशी बनविता येते ते शिकवणार आहे. या कार्यशाळेत इकोल फ्रेण्डली ज्वेलरी अंतर्गत गवताचे मोती, शंखांची ज्वेलरी, गुंजेची ज्वेलरी सोबतच इकोल फ्रेण्डली फ्लावर मेकींग, फ्लावर पॉट, नवीन फेशनेबल स्टोल सोबतच इतर वस्तु बनविणे शिकायला मिळणार आहे. कार्यक्रमस्थळी सखी मंच सभासद आयकार्ड आणणे आवश्यक आहे. तसेच येताना वही व पेन सोबत आणावे. कार्यशाळा वेळेवर सुरू होईल. तरी जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा उपयोग घ्यावा, अधिक माहितीकरीता सखी मंच संयोजिका मिनाक्षी फिरके यांच्याशी ९८५0३८२१४0 या क्रमांकावर संपर्क करावा. नोंदणी शुल्क सखी मंच सभासदांकरीता २0 रूपये व इतरांकरीता ५0 रूपये असून प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रथम येणार्‍यास प्राधान्य राहील.

 

Web Title: Durable Eco Frindley Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.