टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचे प्रशिक्षण
By admin | Published: July 20, 2014 11:34 PM2014-07-20T23:34:49+5:302014-07-20T23:34:49+5:30
लोकमत सखी मंचचा उपक्रम : कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलडाणा : लोकमत सखी मंचच्या वतीने बुलडाणा येथील वैष्णवी डीलाईट इंग्लीश स्कुल मध्ये टाकावू वस्तु पासून टिकावू हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी वैष्णवी इंग्लीश स्कुलच्या अध्यक्षा सौ.सुषमा डोडीया तर प्रमुख पाहुण्या म्हणुन संचालिका प्रीती डोडीया उपस्थीत होत्या.
यावेळी झी टी.व्ही.फेम सौ. निता बोबडे यांनी उपस्थित सखी मंच सदस्यांना टाकावू वस्तु पासून विविध कलात्मक टिकावू वस्तु कशा बनवितात याच प्रशिक्षण दिले.इको फ्रेंडली ज्वेलरी, गवत व भोपळ्या पासून दिवाण खान्यातील फ्लॉवर पॉट तर शंख शिंपल्या पासून शोभिवंत दागीने कसे बनविल्या जातात याचे प्रॅत्यक्षीक करून दाखवीले. घरात नियमित येणार्या पण नेहमीच दुर्लक्षीत व मानवाला अपायकारक असलेल्या पॉलीथीन पासून केसामध्य लावण्याचे सुंदर गजरे बोबडे यांनी बनवून दाखविले. तब्बल चार तास चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात सौ बोबडे यांनी विविध टाकावू वस्तुचे सुंदर व शुशोभीत अशा वस्तु बनवून दाखवील्या. या कार्यक्रमाचा सुमारे २00 महिलांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी सौ. सुषमा डोडीया यांनी शाळेचा हॉल उपलब्ध करून दिला होता. या कार्यक्रमाचे संचालन सौ.माधुरी घोरपडे यांनी केले. तर सौ. सुलभा पाटील, मनिषा राठी, संगीता राजोरीया, सुप्रीया वाघमारे, यांचे विशेष सहकार्य लाभले. सुषमा डोडीया यांनी सौ.निता बोबडे व उपस्थित सखीमंच सदस्यांचे आभार मानले.