दुर्गा टेकडी देते नैसर्गिक ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:32+5:302021-05-04T04:15:32+5:30

उमेश कुटे लोणार : कोरोनामुळे सध्या सर्वत्र ऑक्सिजनसाठी धडपड सुरू आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व त्यामुळे समोर येत आहे. लोणार ...

Durga Hill offers natural oxygen | दुर्गा टेकडी देते नैसर्गिक ऑक्सिजन

दुर्गा टेकडी देते नैसर्गिक ऑक्सिजन

googlenewsNext

उमेश कुटे

लोणार : कोरोनामुळे सध्या सर्वत्र ऑक्सिजनसाठी धडपड सुरू आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व त्यामुळे समोर येत आहे. लोणार येथील दुर्गा टेकडीवर समाजसेवक पुंडलिक मापारी यांनी स्वत: ५० हजार झाडे जगविली आहेत. त्यामुळे हा परिसर सध्या नैसर्गिक ऑक्सिजन देत असून त्याचे महत्त्व वाढले आहे.

कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून, ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने लाखो रुपये खर्च करूनसुद्धा रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत आहे. अशावेळी नैसर्गिक ऑक्सिजनचे महत्त्व माणसाला समजायला लागले आहे. सुप्रसिद्ध दुर्गा टेकडी घनदाट वृक्षांनी बहरली आहे. दुर्गा टेकडीचा नैसर्गिक ऑक्सिजन नागरिकांना नवसंजीवनी देत आहे.

ज्येष्ठ समाजसेवक पुंडलिक मापारी यांनी मागील ३० वर्षांपूर्वी घराचा अफाट संपतीचा, कुटुंबीयांचा त्याग करून २१० एकर उजाड माळरानावर आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालून एकट्याच्या बळावर तब्बल ५० हजार झाडे लावून ती जगविली. आज त्या उजाड माळरानावर घनदाट वनराई निर्माण झाली व बहरली आहे. पर्यटकांचे आकर्षणही ही वनराई बनली आहे. विशेष म्हणजे या दुर्गा टेकडीच्या पायथ्याशी कोविड सेंटर असल्याने येथे ऑक्सिजनची सुविधा तर नाही, पण दुर्गा टेकडीवरील नैसर्गिक ऑक्सिजन रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. एकीकडे ऑक्सुजनचा तुटवडा, तर दुसरीकडे नैसर्गिक ऑक्सिजनचे महत्त्व काय आहे हे कळत आहे.

प्रत्येकाने एक तरी झाड लावावे

लोणार परिसरातील नागरिक वृक्षतोड करीत असल्याने शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या, तसेच नैसर्गिक ऑक्सिजन देणाऱ्या या घनदाट वनराईचे जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकांनी घरासमोर व जेथे शक्य होईल तेथे एक तरी झाडे लावावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Web Title: Durga Hill offers natural oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.