बुलडाणा जिल्ह्यात ९५६ ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 05:57 PM2018-10-09T17:57:38+5:302018-10-09T17:58:00+5:30
बुलडाणा : आदीशक्तीच्या नवरात्रोत्सवास १० आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यात ९५६ ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना होणार आहे.
बुलडाणा : आदीशक्तीच्या नवरात्रोत्सवास १० आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यात ९५६ ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना होणार आहे. जिल्ह्यात घरोघरी घटस्थापना करण्यात येते. नवरात्रोत्सवाच्या साहित्यांनी बाजार फुलला असून महिलांची विविध वस्तू खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे.
नऊ दिवस चालणाºया आदीशक्तीच्या नवरात्रोत्सवास जिल्हाभरात बुधवारपासून सुरूवात होत आहे. जिल्ह्यातील सार्वजनीक दुर्गाउत्सव मंडळानी आॅनलाईन परवाना घेतला आहे. त्यासाठी मंडळाची संपुर्ण तयारी झाली असून अनेकांनी एक दिवसआधीच दुर्गा देवीची मुर्ती खरेदी केल्या आहेत. जिल्हाभरात प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक दूर्गोत्सव साजरा होतो. पर्यावरण तसेच आरोग्य विषयक प्रबोधन करणारी दृश्ये, आकर्षक रोषणाई, स्वागत-द्वार व दिव्यांच्या प्रकाशात देवीच्या मंडपाचा परिसर न्हावून निघतो. मंदिरासह अन्य देवस्थानांतही घट स्थापना करण्यात येते. नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यात ९५६ मंडळात घटस्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सव मंडळं कार्यरत असून, प्रत्येक मंडळाकडून सामाजिक बांधीलकी राखण्याची परंपरा जोपासल्या जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीत सार्वजनिक दुर्गा मंडळांकडून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविले जातात. शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. रस्त्यांवर भक्तांची मोठी वर्दळ असते. सध्या सराफ गल्ली, बाजार चौक, कारंजा चौक, स्टेट बँक चौक, संभाजीनगर, चिखली रोड, मलकापूर रोड, जुना गाव, सुंदरखेड, महाराणा प्रताप चौक या ठिकाणी नवरात्र उत्सवादरम्यान भाविकांची मोठी गर्दी असते. मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक दिवसाचे नियोजन करीत असून, शहरातील विविध मार्गांवर रोशणाई व सजावटीचे काम पूर्ण झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पुर्वसंधेला बाजारात महिलांची घटस्थापनेसाठी विविध साहित्य खरेदी करण्याकरिता गर्दी दिसून आली.
गरबांची रेलचेल
नवरात्रोत्सवामध्ये गरबाला अत्यंत महत्व असते. बुलडाणा शहरासह अनेक ठिकाणी गरबाचे आयोजन करण्यात येते. उत्सव काळात पार पडणाºया गरबासाठी काही महिला व मुलींनी एक महिना आधीपासूनच प्रशिक्षण व सराव सुरू केला होता.