बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदीच्या काळातच ४४ टक्क्यांनी वाढले काेराेनाचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 11:54 AM2021-05-05T11:54:00+5:302021-05-05T11:54:11+5:30

Corona Cases in Buldhana : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३१ मार्च ते १४ एप्रिल या पंधरवड्याच्या तुलनेत तब्बल ४४ टक्क्यांनी वाढली आहे.

During the curfew in Buldana district, the number of patients increased by 44% | बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदीच्या काळातच ४४ टक्क्यांनी वाढले काेराेनाचे रुग्ण

बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदीच्या काळातच ४४ टक्क्यांनी वाढले काेराेनाचे रुग्ण

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या काळातच जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३१ मार्च ते १४ एप्रिल या पंधरवड्याच्या तुलनेत तब्बल ४४ टक्क्यांनी वाढली आहे. पॉझिटिव्हिटी रेटही एक टक्क्यांनी वाढून १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या १५ दिवसात १५ हजार ३३ कोरोनाबाधित तपासणीत समोर आले आहेत.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लादत संचारबंदी घोषित केली आहे.  नेमक्या याच काळात पूर्वीच्या तुलनेत ४४ टक्के अर्थात १५ हजार ३३ रुग्ण वाढले आहे. ३१ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात ७६ हजार ५९ संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.  त्यात १० हजार ३७० जण बाधित निघाले, तर याच कालावधीत २,१३२ जणांनी कोरोनावर मात केली होती. 
त्याच्या तुलनेच १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान जिल्ह्यात एक लाख एक हजार ४१० संदिग्धांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १५ टक्के पॉझिटिव्हिटी रेटनुसार १५ हजार ३३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे संचारबंदीतही कोरोनाचा आलेख जिल्ह्यात चढाच असल्याचे निदर्शनास येत आहे.


या कारणामुळे वाढली रुग्णसंख्या
  सकाळी ७ ते ११ यावेळेतच भाजीपाला, दूध, किराणा वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा होती. त्यामुळे बाजारात एकाच वेळी मोठी गर्दी होत होती. व्यावसायिकांनी निर्धारित करून दिलेली वेळ पाळली नाही. त्याचाही फटका बसला.
  संदिग्धांचे अहवाल जवळपास ७ ते ८ दिवसांनंतर कळत होते. या विलंबाचा हातभार कोरोना संसर्ग वाढण्यास झाला. स्वॅब दिल्यानंतर संदिग्ध घरीच क्वाॅरण्टीनमध्ये न राहता फिरत होते. 
  १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान पूर्वीच्या तुलनेत संदिग्धांच्या चाचण्या २५ टक्क्यांनी वाढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोरोनाबाधितांचेही प्रमाण वाढले.

Web Title: During the curfew in Buldana district, the number of patients increased by 44%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.