वर्षभरात बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करू - शांतिलाल मुथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:16 AM2018-02-26T01:16:15+5:302018-02-26T01:16:57+5:30

सुलतानपूर : शासन, प्रशासन, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांच्या  सहकार्याने विविध उपक्रम राबवून एका वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त  करण्याचा मानस असून, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४ मार्चपासून  लोणार तालुक्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ  होणार आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीत तो टाकण्यात  येईल. शेतकर्‍यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आपापली शे ती सुपीक करावी, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी येथे केले.

During the year, make the district free of drought - Shantilal Mutha | वर्षभरात बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करू - शांतिलाल मुथा

वर्षभरात बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करू - शांतिलाल मुथा

googlenewsNext
ठळक मुद्देसुलतानपूरमध्ये नियोजनाबाबत झाली बैठक मोठय़ा संख्येने होती शे तकर्‍यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
सुलतानपूर : शासन, प्रशासन, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांच्या  सहकार्याने विविध उपक्रम राबवून एका वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त  करण्याचा मानस असून, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४ मार्चपासून  लोणार तालुक्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ  होणार आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीत तो टाकण्यात  येईल. शेतकर्‍यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आपापली शे ती सुपीक करावी, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी येथे केले.
स्थानिक वेदांत आश्रमात २५ फेब्रुवारी रोजी शेतकर्‍यांसाठी आयोजित  सभेत ते बोलत होते. दरम्यान, आगामी सहा महिने हे काम चालणार  असून, यामुळे बुलडाणा जिल्ह्याला एक टीएमसी पाणीसाठा निर्माण  होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी तहसीलदार सुरेश कव्हळे  यांनीदेखील या शेतकरी हिताच्या उपक्रमासाठी शासकीय सुट्यांचा  विचार न करता सर्वतोपरी महसूल प्रशासनाकडून त्यांच्या अखत्यारी तील  अधिकाराचा वापर करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.  कार्यक्रमाला जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन, जयचंद भाटिया,  बाफना, भिकमचंद रेदासनी, तुषार बेदमुथा, मयूर गेल्डा, नीलेश नाहटा,  कृषी अधिकारी दांडगे, भैयासाहेब पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्यप ती दिलीप वाघ, पंचायत समितीचे गटनेते डॉ. हेमराज लाहोटी, पंचायत  समिती सदस्यपती गजानन भोकरे, बाजार समितीचे शिवपाटील  तेजनकर, कांता पाटील, वामनराव झोरे, शिवप्रसाद सारडा, विजय  खोलगडे, दत्तात्रय शेवाळे, मधुकर जैन, ग्रामविकास अधिकारी मो तीराम डव्हळे, सतीश बोराळकर, मोहन जैन यांच्यासह गाव परिसरा तील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. या अभियानाबाबत सक्रियपणे  सहभागी होण्याचे ग्रामीण भागातील नागरिक सांगत आहेत.

खासगी टँकरने पाणी पुरवठा
सुलतानपुरात जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १५  व्या, १६ व्या दिवशी अवघे २0 मिनिटे ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा  केला जातो, अशी खंत ग्रामस्थांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. येथून  हाकेच्या अंतरावर बोराखेडी तलाव असला, तरी सुलतानपूर मात्र  तहानलेले असून, खासगी टँकरने पाणी विक्री तेजीत आहे. त्यामुळे  शासन व प्रशासनाप्रती गावकर्‍यांमध्ये संताप आहे.

Web Title: During the year, make the district free of drought - Shantilal Mutha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.