बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी ई-ग्रंथालय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:23 AM2017-11-25T01:23:35+5:302017-11-25T01:26:16+5:30
स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अभ्यासिका कक्षेत ई-ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एम पीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी ई- ग्रंथालयमध्ये ५0 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अभ्यासिका कक्षेत ई-ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एम पीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी ई- ग्रंथालयमध्ये ५0 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय सेतू समिती अंतर्गत एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी ई-ग्रंथालयमध्ये ५0 विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहे त. अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्जासोबत पदवीचे प्रमाणपत्र जोडून अर्ज ई- ग्रंथालय, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर अर्ज व पदवीचे प्रमाणपत्र २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजेपासून ते ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच आवश्यकता असल्यास परीक्षेस पात्र ठरलेल्या उमदेवारांची लेखी परीक्षेची यादी व प्रवेशपत्र सदर संकेतस्थळावर १५ डिसेंबर रोजी अपलोड करण्यात यणार आहे.