ई पास नावालाच; कोणीही यावे, टिकली मारून जावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:05 PM2021-04-27T12:05:19+5:302021-04-27T12:05:40+5:30
E pass rule not follow strictly : बुलडाणा शहरामध्ये केवळ शहर पाेलीस स्टेशनसमाेर काही तासच वाहनांची तपासणी करण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हाबंदीही करण्यात आली असून, ई पास असल्याशिवाय शहरांमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. बुलडाणा शहरामध्ये केवळ शहर पाेलीस स्टेशनसमाेर काही तासच वाहनांची तपासणी करण्यात येते. त्यानंतर संचारबंदीतही वाहनांची दिवसभर वर्दळ सुरू असते.
जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच जिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. शहरांमध्ये ई पास असल्याशिवाय प्रवेश नाकारण्यात आला आहे.
बुलडाणा शहरात मात्र पाेलीस स्टेशनसमाेर काही तास तपासणी करण्यात येते. त्यानंतर दिवसभर व रात्री वाहनांचा मुक्त संचार सुरू असताे. त्यामुळे ई पास नावालाच, कुणीही यावे, टिकली मारून जावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.