ई-पॉस मशीनव्दारे धान्य वितरीत न करणा-या दुकानदारांची अनामत रक्कम होणार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 07:49 PM2017-09-21T19:49:00+5:302017-09-21T19:49:13+5:30
बुलडाणा : आॅगस्ट २०१७ मध्ये स्वस्त धान्य दुकानदाराने ई - पॉस यंत्राव्दारे धान्य वाटप केले नाही तर त्याची अनामत रक्कम दंड म्हणून शासन खजिन्यात जमा करण्यात येणार आहे.
Next
ठळक मुद्देआॅगस्ट २०१७ मध्ये १४७ दुकानदारांनी ई - पॉस यंत्राव्दारे धान्य वितरण केले नसल्याचे निदर्शनास आले आहेप्राधिकार पत्राची १०० टक्के अनामत रक्कम दंड म्हणून शासन जमा
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आॅगस्ट २०१७ मध्ये स्वस्त धान्य दुकानदाराने ई - पॉस यंत्राव्दारे धान्य वाटप केले नाही तर त्याची अनामत रक्कम दंड म्हणून शासन खजिन्यात जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आॅनलाईन ई - पॉस यंत्राव्दारे स्वस्त धान्य पात्र लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात आले. आॅगस्ट २०१७ मध्ये १४७ दुकानदारांनी ई - पॉस यंत्राव्दारे धान्य वितरण केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानाच्या प्राधिकार पत्राची १०० टक्के अनामत रक्कम दंड म्हणून शासन जमा केली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी कळविले आहे.