ई- आर विवरण पत्र सादर करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:43+5:302021-04-03T04:30:43+5:30
बुलडाणा : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, औद्योगिक आस्थापना तसेच अनुदानित विना अनुदानित शाळा महाविद्यालये यांनी ३० ...
बुलडाणा : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, औद्योगिक आस्थापना तसेच अनुदानित विना अनुदानित शाळा महाविद्यालये यांनी ३० एप्रिलपूर्वी ई- विवरण पत्र सादर करावे, असे आवाहन करण्यात आले.
-------------
मुरघास निर्मितीसाठी अर्थसहाय्य मिळणार
बुलडाणा : जिल्ह्याकरिता राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मुरघास निर्मिती करिता सायलेज बेलर मशिन युनिट स्थापन करण्यात येणार आहे. या मशिनसाठी पात्र संस्थांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. जी. बोरकर यांनी केले आहे.
------
उपनिबंधक कार्यालयाकडून अर्ज आमंत्रित
बुलडाणा : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा यांच्यावतीने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम अंतर्गत चौकशी/ प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनल ) तयार करण्यासाठी सहकार खात्यातून सेवा निवृत्त झालेले अधिकारी (वयाची ७० वर्ष पूर्ण न झालेले), निवृत्त न्यायाधीश, वकील, चार्टर्ड अकाउन्टंट यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
-------
शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावे
बुलडाणा : भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सदर महाडीबीटी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या पोर्टलवर सर्व पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या वेळेच्या आत अर्ज भरून लाभ घ्यावा. प्राचार्यांनी सदर अर्ज सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवावे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
-------
कोरोना लसीकरणाला प्रतिसाद
मोताळा: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आयोजित लसीकरण शिबिराला शुक्रवारी ४५ वर्षांवरील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तालुक्यातील नागरिकांनी लसीकरण करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले.
---
कोविड लसीकरण मोहीम यशस्वी करा
सिंदखेड राजा: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले.
-------
किनगाव जट्टू येथे लसीकरणाला सुरूवात
किनगाव जट्टू: येथील आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ. सानप यांच्या पथकाकडून प्रयत्न केले जात आहेत.
--------
वनीकरण विभागास बियाणे भेट
बुलडाणा: कोरोना लॉकडाऊन काळात जमा करण्यात आलेल्या झाडांच्या बिया सामाजिक वनीकरण विभागास भेट देण्यात आल्या. मुक्तांगण फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
---
१३ कोटी रूपयांचा ऑनलाइन भरणा
बुलडाणा: कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत वीज ग्राहकांनी ऑनलाइन वीज भरणा करण्यासाठी पुढाकार घेतला. बुलडाणा जिल्ह्यात १२.४९ कोटी रुपयांचा ऑनलाइन भरणा केला.
---
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
मोताळा: तालुक्यातील मूर्ती येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विक्रम माथने यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले.
------