पावसासाठी आठ दिवसांपासून अन्नत्याग
By admin | Published: June 25, 2017 01:39 PM2017-06-25T13:39:08+5:302017-06-25T13:39:08+5:30
पाऊस यावा यासाठी अन्नत्याग करुन व मौनव्रत करुन देवाला साकडे घातले आहे.
राजस्थानच्या साधूची तपस्या: वाशिम तालुक्यातील सोयता शेतशिवारात मांडले ठाण
कोंडाळा महाली : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत असताना आनंदराज उर्फ जयहरी महाराज यांनी सोयता येथील प्रवेश राऊत यांच्या शेतात १९ जुनपासून पाऊस यावा यासाठी अन्नत्याग करुन व मौनव्रत करुन देवाला साकडे घातले आहे.
मूळचे पुणे येथील रहिवासी असलेले आनंदराज महाराज यांनी ३० वर्षापासून घराचा त्याग केला असून, त्यांची सतत भ्रमंती सुरू आहे. ते २००५ मध्ये विदर्भात आले. त्यानंतर ते काही वर्षे सोयता येथे रघुनाथ स्वामी संस्थानवर राहिले. त्यांनी सलग तीन वर्षे सोयता येथे अखंड हरिनाम व श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यानंतर ते राजस्थान मध्ये गेले. राजस्थान मध्ये त्यांनी पावसासाठी अनेक वेळा पावसासाठी तपश्या केली. राजस्थानमध्ये त्यांना बारीशवाले बाबा म्हणून ओळखतात. ते राजस्थानमधून ३० मे विदर्भात आले. शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली असून, गेली आठ दिवसापासून परिसरामध्ये पाऊस न आल्यामुळे पिकासाठी पाऊस अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. त्याकरिता पाऊस यावा म्हणून गेली पाच दिवसापासून अन्नत्याग करुन मौन धरले आहे. तसेच पाऊस येत नाही तोपर्यंत स्रान न करण्याचाही त्यांनी संकल्प केला असून, भर उन्हामध्ये उभे राहून त्यांची तपस्या सुरु आहे.