जलवाहिनीला गळतीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:44+5:302021-02-15T04:30:44+5:30

अमडापूर हे गाव चिखली तालुक्यातील सर्वात मोठे आहे. मात्र या गावच्या पाणी समस्येचा विषय वेळोवेळी समोर येत आहे. ...

Eclipse of the aqueduct | जलवाहिनीला गळतीचे ग्रहण

जलवाहिनीला गळतीचे ग्रहण

Next

अमडापूर हे गाव चिखली तालुक्यातील सर्वात मोठे आहे. मात्र या गावच्या पाणी समस्येचा विषय वेळोवेळी समोर येत आहे. पाईप लाईन लिकेजमुळे गावकऱ्यांना धरणांमध्ये पाणी असताना सुद्धा पाणी वेळेवर मिळत नाही. कुचकामी झालेल्या नळयोजनेमुळे गावकऱ्यांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. गावातील नागरिकांमधून कुचकामी दर्जाच्या नळयोजनेबाबत रोष व्यक्त होत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गावात पाणी आले नसल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

नुकत्याच सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

अमडापूर या गावाकऱ्यांची कायम पाणी समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून ८ कोटी रुपये खर्च करून गावापासून ३ ते ४ कि.मी. अंतर असलेल्या ब्राम्हणवाडा धरणावरून अमडापूरसाठी नळयोजना कार्यन्वित केली आहे. ही नळयोजना झाल्यावर गावकऱ्यांना या नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता आपली पाणी समस्या कायमची सुटली आहे, अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र ही नळ योजना कुचकामी ठरत आहे. एका महिन्यात ३ ते ४ वेळा फूटतूट सुरू आहे. त्यामुळे गावकऱ्यांना कधी आठ दिवस तर कधी बारा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी या नळयोजनेविषयी चार प्रश्न बियाणे महामंडळ संचालक वल्लभराव देशमुख यांनी मांडले. कुचकामी झालेल्या नळयोजनेबाबतचा प्रश्न सोडवा व गावकऱ्यांना दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी केली आहे.

Web Title: Eclipse of the aqueduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.