विद्यार्थ्यांनी तयार केल्या इको फ्रेंडली गणपती मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:40 AM2021-09-15T04:40:05+5:302021-09-15T04:40:05+5:30
सध्या कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला काहीच वाव मिळत नाही. त्यांना कृतीतून प्रत्यक्ष आनंद द्विगुणित व्हावा याकरिता असे उपक्रम आवश्यक ...
सध्या कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला काहीच वाव मिळत नाही. त्यांना कृतीतून प्रत्यक्ष आनंद द्विगुणित व्हावा याकरिता असे उपक्रम आवश्यक आहेत.
विद्यार्थ्यांच्या कृतिशीलता व सर्जनशीलतेला वाव मिळावा या हेतूने मुख्याध्यापकांनी इको फ्रेंडली गणपती बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कौशल्याने गणेशमूर्ती तयार करून सादर केल्या.
मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी उत्कृष्ट मातीचे गणपती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्यांना बक्षीस वितरण केले. विद्यार्थ्यांना आगळ्यावेगळ्या कृतीयुक्त उपक्रमात सहभागी होण्याचा खूप आनंद झाला. या उपक्रमात शाळेतील महेंद्र कुमार तायडे, सुनंदा इंगळे व जया चव्हाण आदींनी सहभाग घेतला.