अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थचक्र बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:57+5:302021-01-16T04:38:57+5:30
कर्मचाऱ्यांनी जगावे कसे! गेल्या नऊ महिन्यांपासून अभियांत्रिकी महाविद्यालये बंद असल्याने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ...
कर्मचाऱ्यांनी जगावे कसे!
गेल्या नऊ महिन्यांपासून अभियांत्रिकी महाविद्यालये बंद असल्याने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगारही झाले नाहीत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा आणि कर्मचाऱ्यांनी जगावे कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार कसे करणार!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेले अभियांत्रिकी महाविद्यालये अद्याप सुरू झाले नाहीत. आता पीजीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्यात येत आहेत; परंतु विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी सक्ती करू नये, सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार कसे करणार, असा प्रश्न आहे. पगार होत नसल्याने कर्मचाऱ्यांची सहनशक्ती संपली आहे. हे कर्मचारी आपला परिवार कसे चालवणार!
डॉ. प्रदीप जावंधिया, प्राचार्य, पंकज लद्धड अभियांत्रिकी महाविद्यालय बुलडाणा.
महाविद्यालयांची संख्या
शासकीय ०
खासगी ७
प्राध्यापकांची संख्या ३००
शिक्षकेतर कर्मचारी संख्या २००