बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:25+5:302021-06-26T04:24:25+5:30

संस्थाध्यक्ष जयश्री शेळके यांच्या संकल्पनेतून दिशा बुलडाणा जिल्हा महिला दिशा बचतगट फेडरेशनची स्थापना करण्यात आली. योग्य नियोजन, पारदर्शक कारभारामुळे ...

Economic upliftment of women through self help groups | बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती

बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती

Next

संस्थाध्यक्ष जयश्री शेळके यांच्या संकल्पनेतून दिशा बुलडाणा जिल्हा महिला दिशा बचतगट फेडरेशनची स्थापना करण्यात आली. योग्य नियोजन, पारदर्शक कारभारामुळे दिवसेंदिवस संलग्न बचतगटांची संख्या वाढत आहे. आज रोजी जवळपास १ हजार बचतगट 'दिशा' सोबत जोडलेले आहेत. जिल्ह्यातील अनेक बचतगटांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. त्यामुळे बचतगटाच्या महिलांना स्वयंरोजगाराद्वारे विकास साधता आला आहे. कोरोनाकाळात सर्व उद्योगधंदे, कारखाने बंद पडले. त्यामुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, अशा परिस्थितीतही बचतगटाच्या महिलांनी आर्थिक चळवळ जिवंत ठेवली. खेड्यापाड्यातील अशा सक्रिय बचतगटांना दिशा बचतगट फेडरेशनने कर्ज उपलब्ध केले. परिणामी, कित्येक कुटुंबांना आपला प्रपंच चालविणे शक्य झाले. बुलडाणा जिल्हा दिशा महिला बचतगट फेडरेशनच्या सुसूत्री कारभारामुळे अनेक बचतगट स्वतःहून जोडले जात आहेत. नुकताच जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा खुर्द येथील समर्थ महिला बचतगट फेडरेशनसोबत संलग्न करण्यात आला. यावेळी बचतगटाच्या अध्यक्ष जयश्री अरुण पानेरकर, सचिव पुष्पा विठ्ठल वाघ, महिला बचत गटाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.

Web Title: Economic upliftment of women through self help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.