बच्चू कडूंच्या लढय़ाला बुलडाण्यातून सव्वा लाखांची मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:49 AM2018-01-19T00:49:29+5:302018-01-19T00:52:47+5:30

बुलडाणा : आमदार बच्चु कडू यांना पोलीस कर्मचार्‍यास मारहाण प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवित सात महिन्यांच्या शिक्षेसह १२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सदर दंड भरण्याची जबाबदारी उचलत आमदार बच्चु कडू यांच्या सर्मथनार्थ पुढील न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रहारचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी बुलडाणा जिल्हा प्रहारच्या वतीने १ लाख २0 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Economical Help for Bacchu Kadu's agitation | बच्चू कडूंच्या लढय़ाला बुलडाण्यातून सव्वा लाखांची मदत!

बच्चू कडूंच्या लढय़ाला बुलडाण्यातून सव्वा लाखांची मदत!

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस कर्मचार्‍यास मारहाण प्रकरणी न्यायालयाने आमदार बच्चु कडू यांना दोषी ठरवित सात महिन्यांच्या शिक्षेसह १२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आमदार बच्चु कडू यांना पोलीस कर्मचार्‍यास मारहाण प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवित सात महिन्यांच्या शिक्षेसह १२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सदर दंड भरण्याची जबाबदारी उचलत आमदार बच्चु कडू यांच्या सर्मथनार्थ पुढील न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रहारचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी बुलडाणा जिल्हा प्रहारच्या वतीने १ लाख २0 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अचलपूरचे आमदार बच्चु कडू हे गेल्या २५ वर्षांपासून गोरगरीबांसाठी लढत आहे. कर्तव्यात कसुर करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या विरोधात आमदार बच्चू कडू यांनी उभारलेला लढा हा स्वत: साठी नव्हता तर सामान्य जनतेसाठी होता. परंतू त्यांना या लढय़ात झालेली शिक्षा व दंडांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे पुढील न्यायालयीन लढाई लढण्यासाठी बुलडाणा  जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने १ लाख  २0 हजार रुपयांची मदत जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी जाहीर  केली. तसेच २४ जानेवारी रोजी सदर मदत रोख स्वरूपात मुंबई येथे आ.बच्चू कडू यांना देण्यात येणार असल्याची माहिती वैभवराजे मोहिते यांनी दिली.

Web Title: Economical Help for Bacchu Kadu's agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.