शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:31 AM2021-04-19T04:31:37+5:302021-04-19T04:31:37+5:30
पाट्या बदलून दुकाने झाली अत्यावश्यक लोणार : कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी सरकारने बुधवारी रात्रीपासून लॉकडाऊन लागू केल्यानंतर काही व्यावसायिकांनी ...
पाट्या बदलून दुकाने झाली अत्यावश्यक
लोणार : कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी सरकारने बुधवारी रात्रीपासून लॉकडाऊन लागू केल्यानंतर काही व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी नवी शक्कल शोधली आहे. जुन्याच व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचे नवे रूप देऊन दुकाने सुरू ठेवली आहेत. यात काहींनी तर दुकानाची केवळ पाटी बदलली असून, काहींनी पूर्वीच्याच पाटीवर दुसरी पाटी लावली आहे.
पीक विम्यापासून शेतकरी वंचित
बुलडाणा : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. आधीच शेतकरी संकटात सापडलेले असताना विम्याची रक्कम मिळालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी विमा काढल्यावरही त्यांना लाभ मिळालेला नाही.
राेजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी
डाेणगाव : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. ग्रामीण भागात खरीप हंगाम संपल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. प्रशासनाने राेजगार हमी याेजनेतून कामे सुरू करावीत, अशी मागणी हाेत आहे.
स्वस्त धान्याचे वाटप बंद करण्याचा इशारा
माेताळा : तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी अजून मागण्या मान्य न झाल्यास १ मेपासून स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप बंद करण्यात येणार असल्याचा इशारा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने दिला आहे.
पांदण रस्त्याची कामे करण्याची मागणी
देऊळगाव मही : परिसरातील अनेक पांदण रस्त्यांची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगाम सुरु हाेण्यापूर्वी शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
काेराेना दक्षता समित्या कागदावरच
बिबी : परिसरात गत काही दिवसांपासून काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे गाव पातळीवर दक्षता समित्या स्थापन करण्याची सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. मात्र, बिबी परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी समित्यांची स्थापनाच केली नसल्याचे चित्र आहे.
अनेक लसीकरण केंद्र बंद
बुलडाणा : जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने ग्रामीण भागातील अनेक केंद्र बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, लसीकरण केंद्रांना लसीचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे. याकडे आराेग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
नागरिकांना तातडीने लस देण्याची मागणी
चिखली : शहरातील प्रभाग क्र. ५ मधील संत रविदास नगर, गांधी नगर परिसरातील नागरिकांना काेविड प्रतिबंधात्मक लस तातडीने देण्याची मागणी छाेटू कांबळे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. चिखली शहरासह तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे.
संचारबंदीतही रेतीची अवैध वाहतूक सुरूच
देऊळगाव राजा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लावण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळातही रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. एकीकडे सर्वसामान्यांना संचारबंदी असताना दुसरीकडे रेतीची वाहने दिवसभर वाहतूक करीत असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये आहे.
वीकेंड लाॅकडाऊनवरून व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम
बुलडाणा : गत आठवड्यात शुक्रवारी सायंकाळपासून ते साेमवार सकाळपर्यंत वीकेंड लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. १४ एप्रिलपासून शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे, वीकेंड लाॅकडाऊनविषयी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. जीवनाश्यक वस्तूंची काही दुकाने बंद, तर काही सुरू असल्याचे चित्र हाेते.
भाजीपाला पिकांचे नुकसान
मेहकर : परिसरात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, कृषी पंपासाठी आठवड्यातून चार दिवस दिवसभर भारनियमन असल्याने या पिकांना पाणी देण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. काही भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाण्याअभावी भाजीपाला पिकांचे नुकसान होत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे.
सिंदखेड राजा तालुक्यात वीजचोरीकडे दुर्लक्ष
सिंदखेड राजा : तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजचोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी आकडे टाकून वीजचोरी केली जात असल्याचे चित्र आहे. महावितरणने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या महावितरणकडून विद्युत देयक थकलेल्यांचे वीज कनेक्शन तोडण्याकडे लक्ष दिले जात आहे.
किनगाव राजात मोबाईल सेवा ठप्प
किनगाव राजा : परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मोबाईल टॉवर वारंवार बंद राहात असल्याने रेंज मिळत नाही. रेंज नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.